पुढारी वृत्तसेवा
अनेकांना सतत सुस्ती येणे, अस्वस्थ वाटणे, झोप येणे किंवा अशक्तपणा जाणवणे अशा समस्या भेडसावतात.
आपण याला केवळ हवामानाचा परिणाम समजतो, पण आयुर्वेदानुसार हे शरीरात वाढलेल्या विषारी घटकांचे लक्षण असू शकते.
हे विषारी घटक शरीर आतून पोखरतात आणि आपल्याला थकवा जाणवू लागतो. या समस्येवर मात करण्यासाठी आयुर्वेदामध्ये एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय सांगण्यात आला आहे.
सकाळी रिकाम्या पोटी त्रिफळा, गुळवेल (गिलोय), मध आणि हळद हे घटक कोमट पाण्यात मिसळून घेतल्यास शरीराला फायदे होतात.
त्रिफळा: हे मिश्रण आतड्यांची खोलवर स्वच्छता करते. पचनसंस्था सक्रिय करून शरीरातील साठलेली घाण बाहेर काढण्यास त्रिफळा अत्यंत गुणकारी आहे.
गुळवेल (गिलोय): आयुर्वेदात गुळवेल हे 'त्रिदोष' संतुलित करणारे मानले जाते. हे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि यकृत तसेच पोटाचे आरोग्य सुधारते.
हळद: हळद नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल आहे. ती शरीरातील जंतू नष्ट करते आणि प्रतिकारशक्ती मजबूत करते.
मध: मध या सर्व आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा प्रभाव वाढवण्याचे काम करते आणि चवीलाही उत्तम असते.