mental wellness |औषधं नको, फिरायला जा! 'या' देशात दिलं जातं 'ट्रॅव्हल प्रिस्क्रिप्शन'

पुढारी वृत्तसेवा

मानसिक आरोग्यासाठी जगभरात नवनवीन प्रयोग केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर स्वीडनने एक नाविन्यपूर्ण पाऊल उचलले आहे.

स्‍वीडन येथे डॉक्टर आता रुग्णांना फक्त औषधेच नाही, तर 'ट्रॅव्हल प्रिस्क्रिप्शन' (Travel Prescription) देतात. असा उपक्रम राबविणारा हा पहिला देश ठरला आहे.

तणाव (Stress), थकवा (Burnout) आणि इतर मानसिक समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांना दिलासा देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या नवीन प्रायोगिक प्रकल्पांतर्गत, डॉक्टर रुग्णांना काही काळासाठी सहलीला जाण्याचा सल्ला देतात. ही एखादी सामान्य सुट्टी नसून एक नियोजित (Structured) ट्रीप असते, जी खास मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी तयार केलेली असते.

आजच्या धावपळीच्या जीवनात कामाचा सततचा दबाव, स्क्रीनवरील वाढलेला वेळ आणि तोच दिनक्रोरम यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. अशा वेळी केवळ औषधांवर अवलंबून राहणे पुरेसे नसते.

संशोधनातून असे समोर आले आहे की, नवीन वातावरण मनाला शांती देते. तसेच निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने चिंता (Anxiety) कमी होते.

प्रवासामुळे मेंदूला पुन्हा ताजेतवाने (Reset) होण्याची संधी मिळते. कामातून ब्रेक घेतल्यामुळे कार्यक्षमता वाढते.

ट्रॅव्हल प्रिस्क्रिप्शन उपक्रम केवळ आजाराच्या लक्षणांवर उपचार करण्याऐवजी, त्यामागच्या मूळ कारणांवर लक्ष केंद्रित करतो. रुग्णाचे वातावरण आणि जीवनशैली बदलून त्याला बरे करण्याचा प्रयत्न केला जातो.

ट्रॅव्हल प्रिस्क्रिप्शन प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाला, तर येणाऱ्या काळात इतर देशही या मॉडेलचा विचार करू शकतात.

येथे क्‍लिक करा.