फक्त 7 दिवस... त्यानंतर सूर्य अचानक गायब होणार

पुढारी वृत्तसेवा

7 दिवसांनंतर सूर्य होणार गायब?

12 ऑगस्ट 2026 रोजी वर्षातील सर्वात मोठे पूर्ण सूर्यग्रहण होणार आहे. काही भागांमध्ये दिवसाही रात्रीसारखा अंधार पडणार आहे.

पूर्ण सूर्यग्रहण म्हणजे काय?

जेव्हा चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकतो, तेव्हा सूर्यग्रहण होते. काही मिनिटांसाठी सूर्य पूर्णपणे अदृश्य झाल्यासारखा दिसतो.

यंदाचे ग्रहण का खास आहे?

हे 2026 मधील दुसरे आणि सर्वात मोठे सूर्यग्रहण आहे. अनेक देशांमध्ये हा दुर्मीळ खगोलीय नजारा पाहायला मिळणार आहे.

कोणत्या देशांत दिसणार ग्रहण?

ग्रीनलँड, आइसलँड, पोर्तुगाल, उत्तर स्पेन, आर्क्टिक महासागर आणि अटलांटिक परिसरात पूर्ण सूर्यग्रहण दिसणार आहे.

युरोपमध्ये दिवसा अंधार पडणार

ब्रिटन, आयर्लंड, फ्रान्स, बेल्जियम, स्वित्झर्लंड आणि इटलीच्या काही भागांत सूर्य 90% पर्यंत झाकलेला दिसेल.

भारतात सूर्यग्रहण दिसणार का?

नाही. हे पूर्ण सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे येथे ग्रहणाचा अनुभव घेता येणार नाही.

ग्रहणाची वेळ किती?

भारतीय वेळेनुसार 12 ऑगस्ट रात्री 11:17 वाजता ग्रहण सुरू होईल आणि 13 ऑगस्ट पहाटे 4:25 वाजता समाप्त होईल.

पूर्ण अंधार किती वेळ राहील?

ज्या भागांत पूर्ण सूर्यग्रहण दिसेल, तेथे अवघ्या 2 मिनिटे 18 सेकंद सूर्य पूर्णपणे झाकला जाईल.

इतिहास घडणार!

स्पेनमध्ये 1905 नंतर प्रथमच पूर्ण सूर्यग्रहण दिसणार आहे. त्यामुळे हा दिवस ऐतिहासिक मानला जात आहे.

सुरक्षितपणेच पाहा ग्रहण

सूर्याकडे कधीही उघड्या डोळ्यांनी पाहू नका. प्रमाणित Solar Eclipse Glasses किंवा विशेष फिल्टरचा वापर करूनच सूर्यग्रहण पाहावे.

पावसाळ्यात बिबट्या कुठे जातो? कुठे राहतो?

Leopard | Pudhari
येथे क्लिक करा