मोहन कारंडे
२०२६मध्ये करिअरच्या संधी वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये नवीन तंत्रज्ञान शिकण्याची चढाओढ वाढली आहे.
डिजिटलायझेशनचा वेग वाढल्यामुळे कंपन्यांना अत्याधुनिक कौशल्ये असलेले उमेदवार हवे आहेत. त्यामुळे नवीन युगातील तंत्रज्ञानात स्वतःला कौशल्यवान बनवण्याची नितांत गरज आहे.
डिजिटलमुळे सॉफ्टवेअर डेव्हलपरची मागणी झपाट्याने वाढत असून, कोडिंग आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये करिअरच्या असंख्य संधी निर्माण होत आहेत.
त्याचबरोबर डेटा सायन्स हे क्षेत्र विद्यार्थ्यांचे आकर्षण ठरत आहे. प्रचंड डेटाचे प्रोसेसिंग, विश्लेषण आणि अर्थ लावण्याचे तंत्रज्ञान शिकवल्यामुळे कंपन्यांमध्ये डेटा सायंटिस्टची गरज वाढत आहे.
डिजिटल सुरक्षिततेचे महत्त्व वाढल्यामुळे सायबर सिक्युरिटी हा कोर्स वेगाने लोकप्रिय होत आहे. सायबर हल्ले टाळण्यासाठी आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशिक्षित तज्ज्ञांची मोठी गरज आहे.
चार्टर्ड अकाउंटंट (CA) क्षेत्रालाही सततची मागणी असून, कॉर्पोरेट फायनान्स, कर पालन आणि वित्त व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या पाहणाऱ्या सीए व्यावसायिकांना उच्च दर्जाची नोकरी सुरक्षितता मिळते.
AI (Artificial Intelligence) आणि ML (Machine Learning) या तंत्रज्ञानामुळे स्वयंचलित वाहने, स्मार्ट असिस्टंट्स, आणि उद्योगांतील ऑटोमेशन यांसारख्या अनेक नवकल्पना पुढे येत आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील कोर्सेसही विद्यार्थ्यांसाठी आकर्षक ठरत आहेत.
व्यवसाय डिजिटल होत असल्याने SEO, सोशल मीडिया मार्केटिंग यांसारख्या डिजिटल मार्केटिंग कौशल्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऑनलाईन ब्रॅंड बिल्डिंगसाठी कंपन्या अशा तज्ज्ञांना प्राधान्य देत आहेत.
कंप्युटर सायन्स इंजिनिअरिंग हा विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, IT सर्व्हिसेस, AI, क्लाउड कम्प्युटिंग आणि IoT क्षेत्रात मोठ्या प्रमाणात करिअरच्या संधी उपलब्ध करून देतो.
तज्ज्ञांच्या मतानुसार, या कोर्सेसची लोकप्रियता आणखी वाढणार असून, भविष्यातील रोजगार बाजारात ही कौशल्ये महत्वाची ठरणार आहेत.