Protein Rich Foods | हे पदार्थ आहेत टॉप टेन प्रोटीनचे स्त्रोत!

पुढारी वृत्तसेवा

प्रोटीन हे मानवी शरीराचे "बिल्डिंग ब्लॉक" मानले जाते. शरीराच्या डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत जवळजवळ प्रत्येक पेशी आणि अवयवाच्या कार्यासाठी प्रोटीन अत्यावश्यक असते.

आज काही टॉप टेन पदार्थ पाहूयाजे प्रती १०० ग्रॅम वजनामागे शरीराची किती प्रमाणात प्रोटीनची गरज भागवू शकतात

यामध्ये सर्वाधिक प्रोटीन मिळते ते म्हणजे सोया चंक्स यामध्ये ५२ ग्रॅम (शाकाहारी) — प्रति १०० ग्रॅममध्ये वनस्पतीजन्य प्रथिनांचे प्रमाण सर्वाधिक असते

भोपळ्याच्या बिया: pumpkin seeds

३० ते ३२ ग्रॅम (शाकाहारी) — प्रथिनांसोबत मॅग्नेशियम आणि निरोगी चरबीचा उत्तम स्रोत.

चिकन ब्रेस्ट (बोनलेस):

३० ते ३१ ग्रॅम (मांसाहारी) — कमी चरबीयुक्त आणि उच्च दर्जाच्या प्रथिनांसाठी सर्वोत्तम पर्याय.

सोयाबीन (कच्चे):

३० ते ३१ ग्रॅम (शाकाहारी) — संपूर्ण अमिनो ॲसिड्स असणारा शाकाहारी स्रोत आहे.

शेंगदाणे:

२५ ते २६ ग्रॅम (शाकाहारी) — प्रथिने आणि ऊर्जा देणारा सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे

मटण (लीन/कमी चरबीयुक्त):

२० ते २५ ग्रॅम (मांसाहारी) — शरीरात सहज शोषली जाणारी प्रथिने, लोह आणि व्हिटॅमिन B12 चा समृद्ध स्रोत.

डाळी ( तूर/मूग/मसूर):

२२ ते २४ ग्रॅम (शाकाहारी) — दैनंदिन आहारातील मुख्य शाकाहारी प्रथिनांचा आधार.

बदाम:

२१ ग्रॅम (शाकाहारी) — प्रथिने, फायबर आणि व्हिटॅमिन E चा स्रोत. हा केसांसाठी व त्‍वचेसाठी खपू उपयुक्त आहेत

पनीर:

१८ ते २० ग्रॅम (शाकाहारी) — कॅल्शियम आणि दुग्धजन्य प्रथिनांचा उत्तम स्रोत. अनेकांना मांसाहारीसाठी हा उत्तम शाकाहारी पर्याय ठरतो

टोफू:

१५ ते १७ ग्रॅम (शाकाहारी) — कमी कॅलरीज आणि पचायला हलका सोयाबीनजन्य पर्याय. हे म्हणजे सोयाबीनपासून तयार केलेले पनीर असते