Namdev Gharal
१. हापूस (Alphonso)कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा हापूस जगप्रसिद्ध असून तो आपल्या अवीट चवीसाठी ओळखला जातो. कोकणातील जांभा दगड आणि किनारपट्टीचे हवामान हापूससाठी उत्तम असते
२. केशर (Kesar)मराठवाडा (विशेषतः जालना आणि औरंगाबाद) भागात याचे मोठे उत्पादन होते; हा आंबा गोड आणि केशरी गरासाठी प्रसिद्ध आहे. कोरड्या हवामानात केशरचा दर्जा आणि गोडी उत्तम मिळते
३. पायरी (Payri)हा आंबा अतिशय रसाळ असतो. विशेषतः गुढीपाडव्यानंतर आमरसासाठी पायरीला सर्वाधिक पसंती दिली जाते. रत्नागिरी सिधुदूर्गमध्येच हापूस बरोबर याचेही अधिक उत्पन्न् होते
४. राजपुरी (Rajapuri)आकाराने मोठा असणारा हा आंबा प्रामुख्याने लोणचे आणि मुरांबा बनवण्यासाठी वापरला जातो. पश्चिम महाराष्ट्र: सातारा, सांगली सोलापूर भागात याचे उत्पादन होते
५ रायवळ (Raiwal) ही गावरान जात असून याचा वापर प्रामुख्याने चोखून खाण्यासाठी किंवा रस काढण्यासाठी केला जातो. हा संपूर्ण महाराष्ट्रात आढळतो
६. देवगड Devgad हापूस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडचा हापूस त्याच्या पातळ सालीसाठी आणि मधुर सुवासासाठी वेगळा ओळखला जातो
७. वनराज (Vanraj) या आंब्याचा रंग आकर्षक असून तो बराच काळ टिकतो, त्यामुळे बाजारपेठेत याला चांगली मागणी असते. गुजरात सीमेला लागून असलेला भाग आणि नाशिक जिल्हा येथे उत्पादन होते
८. निलम (Neelum)ही जात महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर लावली जाते. हा आंबा हंगामाच्या शेवटी येतो आणि चवीला गोड असतो. कमी पावसाच्या प्रदेशातही हे झाड चांगले उत्पादन देते
९.सिंधू (Sindhu) कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली ही जात असून या आंब्याची कोय अतिशय पातळ (बिनकोयीचा आंबा) असते. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात नवीन बांगामध्ये याची लागवड होते
१०.रत्ना (Ratna) हापूस आणि नीलम यांच्या संकरातून ही जात तयार झाली असून हा आंबा मोठा आणि तंतूविरहित असतो.