Indian Tourists Choice : भारतीयांनी 2025 मध्‍ये कोणता देश सर्वाधिक सर्च केला?

पुढारी वृत्तसेवा

वर्ष २०२५ मावळतीला लागले आहे. दरवर्षीप्रमाणे गुगलने यंदाही सर्वाधिक सर्च केलेल्या पर्यटन स्थळांची यादी जाहीर केली आहे.

या यादीत भारतीय पर्यटकांनी जगातील अनेक देशांना पसंती दिली असली तरी, दुसऱ्या क्रमांकावर असलेला देश भारतीयांच्या विशेष आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. हा देश दिल्लीपासून अवघ्या ६ ते ७ तासांच्या हवाई अंतरावर आहे.

२०२५ च्या गुगल सर्च लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर 'महाकुंभ २०२५' असून, त्यानंतर दुसऱ्या स्थानावर फिलीपीन्स या देशाने बाजी मारली आहे. फिलीपीन्सला यंदा भारतीयांनी सर्वाधिक सर्च केले आहे.

फिलीपीन्सच्या लोकप्रियतेचे मुख्य कारण म्हणजे तेथील निसर्गसौंदर्य आणि प्रवासाची सुलभता कारणीभूत ठरते.

भारतीयांना फिलीपीन्समध्ये पर्यटनासाठी व्हिसाची गरज नाही. भारतीय पर्यटक तिथे १४ दिवसांपर्यंत विना-व्हिसा फिरू शकतात.

दिल्ली ते मनिला दरम्यान ऑफ-सीजनमध्ये तिकीट साधारण ₹25,000 ते ₹35,000 पर्यंत खर्च येतो.

फिलीपीन्स येथे हॉटेल्सचे दरही आवाक्यात असून, प्रति दिन २.५ हजार ते ४ हजार रुपयांपर्यंत चांगली सुविधा देणारे हॉटेल उपलब्‍ध होवू शकते.

फिलीपीन्समध्ये स्ट्रीट फूड अत्यंत लोकप्रिय आणि स्वस्त आहे. तसेच स्थानिक वाहतुकीचा वापर केल्यास प्रवासाचा खर्च अधिक कमी होतो.

सर्वसाधारणपणे, एका व्यक्तीसाठी ४०,००० ते ५०,००० रुपयांच्या बजेटमध्ये फिलीपीन्सची सहल होऊ शकते.

फिलीपीन्समध्ये बोरा बोरा, एल नीडो, पालावन, मनिला, सेबू, बोहोल आणि बनाउए राइस टॅरेस यांसारख्या ठिकाणांना पर्यटक सर्वाधिक पसंती देतात.

येथे क्‍लिक करा.