Hair Growth Oils | दाट, मजबूत आणि चमकदार केसांसाठी ‘ही’ ५ तेलं ठरतील वरदान

पुढारी वृत्तसेवा

केसांची निगा राखणे ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी नवनवीन उपाय करून पाहतो, तर केसांसाठी वेगवेगळ्या टिप ऐकायला मिळतात

केस सुंदर दिसण्यासाठी टाळू निरोगी ठेवणे, केसगळती कमी करणे आणि केसांना नैसर्गिक चमक मिळवून देणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे

केसांच्या वाढीसाठी उपयुक्त मानली जाणारी ही पाच तेलं अनेक घरांमध्ये वापरली जातात

खोबरेल तेलातील चरबीचे रेणू केसांच्या आतील भागापर्यंत पोहोचण्याइतके सूक्ष्म असतात. त्यामुळे केसांना आतून मजबुती मिळण्यास मदत होते

एरंडेल तेलात रिसिनोलिक अॅसिड असते, जे टाळूतील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते. तसेच ओमेगा-६ फॅटी अॅसिड्स केसांच्या मुळांना पोषण देण्यास मदत करते

आवळ्यापासून तयार केलेले तेल केसांना नैसर्गिक पोषण देण्यासाठी आणि अकाली केस पांढरे होण्यास प्रतिबंध करण्यासाठी उपयुक्त ठरते

रोझमेरी तेल टाळूतील रक्ताभिसरणाला चालना देण्यास आणि केसांच्या मुळांमधील दाह कमी करण्यास मदत करू शकते. त्यामध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्मही असतात

अर्गन तेल व्हिटॅमिन ई आणि फॅटी अॅसिड्सने समृद्ध असते. पोषण मिळण्यासोबतच हीट स्टायलिंग किंवा रासायनिक प्रक्रियांमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करते

केसांच्या वाढीसाठी तेलासोबत पौष्टीक आहार व इतर नियमित टाळू मसाज करण्याची पद्धत ठेवणे अधिक उपयुक्त ठरू शकते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

येथे क्लिक करा