Phobia | तुम्हाला माहिती आहे का मानवाला सर्वात जास्त भिती कशाची वाटते? सापांची भीती आहे ‘या’ क्रमांकावर!

Namdev Gharal

Phobia किंवा भीती ही प्रत्‍येक सजीवाची उत्‍क्रांतीपासूनची नैसर्गिक भावना आहे यामध्ये मानवाचा विचार केल्यास प्रत्‍येकाला वेगवेळ्या प्रकारे, प्राणी, उंची अशी कशाचिही भीती वाटू शकते. अशाच भीतींचे टॉप टेन प्रकार पाहू

1 अरॅक्नोफोबिया (Arachnophobia)

ही कोळी (Spiders) आणि इतर किटकवर्गींय अष्टपाद प्राण्यांची भीती आहे. हा जगातील सर्वात सामान्य फोबिया मानला जातो. सर्वाधिक लोक अशा प्राण्यांना घाबरतात

2 ओफिडिओफोबिया (Ophidiophobia)

या नंतर दुसऱ्या क्रमांकावर मानव हा सापांना खूप घाबरतो याला ओफिडिओफोबिया असे म्हणतात. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत मानवाने स्वतःच्या संरक्षणासाठी ही भीती विकसित केली असावी, असे मानले जाते.

3 अक्रोफोबिया (Acrophobia)

ही उंचीची भीती आहे. यामध्ये व्यक्तीला उंच इमारतीवर किंवा डोंगरावर गेल्यावर चक्कर येणे किंवा भीतीमुळे घाम फुटणे असे प्रकार होतात. ही जगात तिसऱ्या क्रमांकाची उंची आहे

4 एरोफोबिया (Aerophobia)

विमानाने प्रवास करण्याची किंवा हवेत उंच उडण्याची (Flying) भीती. या पाठीमागे अपघात होऊ शकतो ही भीती असते. यामुळे अनेक लोक विमान प्रवास टाळतात.

5 सायनोफोबिया (Cynophobia)

ही कुत्र्यांची (Dogs) वाटणारी तीव्र भीती आहे. सहसा बालपणी कुत्र्याने चावा घेतल्यामुळे किंवा कुत्रे अंगावर आल्यामुळे हा फोबिया निर्माण होतो.

6 अ‍ॅस्ट्राफोबिया (Astraphobia)

विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट यांची भीती. ही भीती लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसते, परंतु काही प्रौढांमध्येही ती कायम राहते. विजांचा गडगडाट अनेकांना दडपणात आणातो

7 ट्रायपॅनोफोबिया (Trypanophobia)

इंजेक्शन किंवा सुई टोचून घेण्याची भीती. डॉक्टरकडे गेल्यावर इंजेक्शनचे नाव काढले तरी अनेकांना भिती वाटते लहान मुले तर भोकांड पसरतात याला ट्रायपॅनोफोबिया म्हणतात. अनेकजण फक्त गोळ्याच द्या म्हणतात

8 सोशल फोबिया (Social Phobia)

याला 'सोशल एन्झायटी' असेही म्हटले जाते. अनेक लोकांना सार्वजनिक कार्यक्रमात जाण्याची भिती वाटते, लोकांमध्ये जाण्याची, गर्दीत मिसळण्याची किंवा लोकांसमोर बोलण्याची भीती म्हणजेज सोशल फोबीया

9 ॲगोराफोबिया (Agoraphobia)

अशा जागांची भीती जिथून बाहेर पडणे कठीण आहे (उदा. लिफ्ट, गर्दीची ठिकाणे, थिएटर). अशा व्यक्तींना घराबाहेर पडायलाही काहीवेळा भीती वाटू शकते.

10 मायसोफोबिया (Mysophobia)

जंतू आणि घाणीची (Germs/Dirt) भीती. यामुळे लोक वारंवार हात धुतात किंवा स्वच्छतेबाबत अतिशय सावधगिरी बाळगतात. ही अनेकांना असते कोणत्‍याही गोष्टीला हात लावला की लोक हात धुतात