Toothbrush cover : टूथब्रश कव्हरमध्ये ठेवावा की ओपन? डेटिंस्ट काय सांगतात?

पुढारी वृत्तसेवा

आपण दररोज सकाळी ब्रश केल्यानंतर सुरक्षेचा विचार करुन तो कव्हरमध्ये घालून ठेवतो, पण असे करणे सुरक्षित आहे का हे जाणून घेऊया

डेंटीस्टच्यामते दररोज टूथब्रश दात घासून झाल्यावर कव्हरमध्ये न ठेवता उघडा ठेवणेच आरोग्यासाठी योग्य आहे. ब्रशवर प्लास्टिक कव्हर लावणे सुरक्षेचे वाटत असले तरी यामुळे बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो

दंततज्ज्ञांच्या मते, वापरल्यानंतर ब्रश ओला राहत असल्याने तो उघड्या आणि हवेशीर जागी ठेवणे गरजेचे असते. हवा खेळती राहिल्याने ब्रश लवकर सुकतो आणि त्यावर हानिकारक बॅक्टेरिया तयार होत नाही

ओला टूथब्रश कव्हरमध्ये बंद करून ठेवल्याने आत राहिलेल्या दमटपणामुळे (Moisture) सूक्ष्म जंतू अतिशय वेगाने वाढतात. असा जंतूसंसर्ग झालेला ब्रश रोज वापरल्यास तोंडाचे आजार, दुर्गंधीचा त्रास उद्भवू शकतो

प्लास्टिक कव्हरचा वापर प्रामुख्याने प्रवासादरम्यानच केला पाहिजे. प्रवासात बॅगेतील धुळीपासून ब्रशचे संरक्षण करण्यासाठी कव्हर उपयुक्त ठरते

कसा ठेवावा ब्रश- टूथब्रश ठेवण्याची योग्य पद्धत पाळणे अत्यंत आवश्यक आहे. ब्रश नेहमी उभा करून ठेवावा, जेणेकरून त्यातील उरलेले पाणी सहज खाली निघून जाईल

याशिवाय ब्रश टॉयलेट सीट किंवा फ्लशपासून शक्य तितका दूर ठेवावा. जर एकाच होल्डरमध्ये घरातील इतर सदस्यांचे ब्रश ठेवले जात असतील, तर ते एकमेकांना टेकणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी

दर ३ ते ४ महिन्यांनी किंवा एखाद्या आजारपणानंतर (उदा. सर्दी, खोकला, तापाची लागण झाल्यानंतर) जुना ब्रश बदलून नवीन ब्रश वापरावा

अजून एक गोष्ट म्हणजे दररोज दात घासण्यासाठी ब्रश वापरण्यापूर्वी आणि वापरल्यानंतर तो वाहत्या स्वच्छ पाण्याने नीट धुणे गरजेचे असते