पुढारी वृत्तसेवा
दात दुखत असेल तर थोडासा कापूर दुखणाऱ्या दाताखाली ठेऊन दाबावे, दाढेत खड्डा असेल तर त्यात भरून द्यावे. वेदना बंद होतात.
दातदुखी असल्यास पपईचे दूध, थोडासा हिंग आणि कापूर मिसळून कापसाच्या बोळ्याने दुखऱ्या दातात ठेवून दाबावे.
लिंबाचा ताजा नरम पाला घेऊन त्याचा रस ज्या बाजूची दाढ दुखत असेल त्या बाजूच्या कानात २ थेंब टाकावे. लगेच आराम येतो.
दात हालला असेल तर तिळाच्या तेलात काळे मीठ वाटून हिरड्यांवर चोळल्याने दात हालायचे बंद होतात.
हिरड्यांतून रक्त येत असेल तर मीठ, हळद आणि तुरटी समप्रमाणात घेऊन त्याचे चूर्ण करून घ्यावे.
चूर्णाने मंजन करावे. फार गरम किंवा फार थंड पेय घेऊ नये.
दातांच्या आरोग्यासाठी गाजर, सफरचंद, आवळा यासारखी फळे खावीत.