उन्हाळ्यात घामाच्या दुर्गंधीला वैतागलाय? करा 'हे' सोपे घरगुती उपाय!

पुढारी वृत्तसेवा

उन्हाळ्यात घाम येणे स्वाभाविक

घाम ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण त्यासोबत येणारी दुर्गंधी त्रासदायक ठरते.

घामाला वास का येतो?

घाम वासरहित असतो; त्वचेवरील बॅक्टेरियामुळे दुर्गंधी निर्माण होते.

अपोक्राइन ग्रंथींची भूमिका

बगल, मान आणि गुप्तांग भागातील ग्रंथीमुळे घामात प्रथिने-फॅट्स येतात, ज्यामुळे वास वाढतो.

आहाराचा परिणाम

तिखट, मसालेदार, लसूण-कांदा यांचे जास्त सेवन घामाची दुर्गंधी वाढवते.

स्वच्छता सर्वात महत्त्वाची

रोज अंघोळ आणि घाम येणाऱ्या भागांची नीट स्वच्छता केल्याने वास कमी होतो.

लिंबाचा उपयोग

लिंबूरस नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आहे—काखेत लावल्यास दुर्गंधी कमी होते.

बेकिंग सोडा फायदेशीर

कपडे धुताना बेकिंग सोडा वापरल्यास ओलसरपणा आणि बॅक्टेरिया कमी होतात.

योग्य कपड्यांची निवड

सैल, सूती कपडे वापरा; सिंथेटिक कपड्यांमुळे घाम अडकतो आणि वास वाढतो.

पाणी आणि हलका आहार

जास्त पाणी प्या, फळे-भाज्या खा; बडीशेप/धणे पाणी शरीर थंड ठेवते व दुर्गंधी कमी करते.