दिवसभराच्या कामानंतर व्यायामाची इच्छा होत नाही? अशावेळी संगीत तुमचा मानसिक थकवा दूर करून व्यायामासाठी तयार करते..एडिनबर्ग विद्यापीठाच्या संशोधनानुसार, आवडती गाणी ऐकल्याने व्यायामाची क्षमता, कामगिरी सुधारते. .मानसिकदृष्ट्या थकलेले असताना संगीत ऐकत केलेला व्यायाम, ताजेतवाने असताना केलेल्या व्यायामाइतकाच प्रभावी ठरतो..संगीत ऐकताना व्यायामात होणाऱ्या श्रमाची- कष्टाची जाणीव कमी होते. यामुळे तुम्ही न थकता जास्त वेळ व्यायाम करू शकता..संशोधनात ५ किलोमीटर धावणाऱ्यांच्या वेळेत संगीत ऐकल्यामुळे लक्षणीय सुधारणा दिसून आली..तुम्ही स्वतः निवडलेली प्रेरणादायी गाणी सर्वाधिक प्रभावी ठरतात. त्यामुळे तुमची एक खास 'वर्कआउट प्लेलिस्ट' तयार करा..व्यायाम टाळण्याऐवजी फक्त तुमचे हेडफोन्स लावा. तुमची आवडती गाणी कंटाळ्याचे रूपांतर उत्साहात करतील..संशोधक डॉ. शॉन फिलिप्स यांच्या मते, मानसिक थकव्यावर मात करण्यासाठी संगीत ही एक प्रभावी रणनीती..लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.