पुढारी वृत्तसेवा
पीठाचे योग्य प्रमाण
भजीचे पीठ भिजवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ किंवा रवा मिक्स करा, यामुळे भजी कमी तेल शोषतात आणि अधिक कुरकुरीत होतात.
गरम तेलाचे मोहन
पीठ तयार झाल्यावर त्यात १-२ चमचे कडकडीत गरम तेल टाका. यामुळे भजी आतून मऊ आणि बाहेरून क्रिस्पी होतात.
तेलाचे तापमान
भजी सोण्यापूर्वी तेल चांगले गरम झाले आहे की नाही हे तपासा; तेल कमी गरम असेल तर भजी जास्त तेल पितात.
पीठाची कन्सिस्टन्सी
पिठात पाण्याचे प्रमाण जास्त होऊ देऊ नका. पीठ जास्त पातळ झाले तर भजी तळताना त्यात तेल जास्त शिरते.
मीठाचा वापर
पिठात मीठ अगदी शेवटी टाका. मीठ आधी टाकून ठेवल्यास भाज्यांना पाणी सुटते आणि पीठ पातळ होऊन तेलकट होते.
सोड्याचा वापर टाळा
पिठात जास्त खाण्याचा सोडा टाकू नका. सोड्यामुळे भजी फुगतात खरी, पण ती खूप जास्त तेल शोषून घेतात.
तळण्याची पद्धत
भजी नेहमी मध्यम आचेवर तळा. गॅस खूप बारीक असल्यास भजी तेलकट होतात आणि मोठा असल्यास बाहेरून जळतात.
टिश्यू पेपरचा वापर
भजी कढईतून काढल्यावर थेट प्लेटमध्ये न ठेवता टिश्यू पेपरवर काढा, जेणेकरून जास्तीचे तेल शोषले जाईल.