अंजली राऊत
डासांचा धोका जवळजवळ प्रत्येक घरातील एक मुख्य समस्या आहे. सिझन कोणताही असला तरी डासांची वाढती संख्या हा जीवघेणा त्रास आहे. डासांमुळे आजारांचा धोका वाढतो
डासांचे कॉइल आणि रिपेलेंट्स हे Expensive असू शकतात. बहुतेकदा पूर्णपणे प्रभावी देखील नसतात आणि त्यांचे दुष्परिणामांमुळे आजार होऊ शकतात.
डासांना दूर ठेवण्यासाठी नैसर्गिक आणि किफायतशीर उपाय आहे. यामध्ये पूर्णपणे नैसर्गिक घटक वापरण्यात आले आहेत
या उपायाकरीता तुम्हाला झाकण असलेले काचेचे भांडे लागेल. तसेच कापूस, लवंग, दालचिनी, चहाची पावडर, मोहरीचे तेल आणि पाणी असे साहित्य लागेल
सर्वात पहिले झाकण असलेल्या काचेच्या भांड्याच्या झाकणाला वर एक छिद्र करा, त्यातून भांड्याच्या आत जाईल अशी कापसाची वात टाका. त्यानंतर या काचेच्या भांड्यात दालचिनी, लवंग, पाणी आणि दीड चमचा चहाची पावडर टाका. शेवटी, मोहरीचे तेल टाका आणि वात पेटवा. या उपायाने डासांना लगेच पळायला लागतील
लवंग आणि दालचिनीच्या वासामुळे आणि नैसर्गिक तेलांमुळे कीटकांना दूर ठेवण्यासाठी मदत होते. लवंगमध्ये युजेनॉल असल्यामुळे, ते डासांविरुद्ध नैसर्गिक न्यूरोटॉक्सिन म्हणून काम करते. त्याचा वास डासांना दूर ठेवतो
दालचिनीच्या तेलात सिनामल्डिहाइड असते, जे डासांना दूर ठेवण्यासाठी आणि त्यांच्या अळ्या मारण्यासाठी प्रभावी असते. लवंगासोबत एकत्रित केल्याने, दालचिनी शक्तिशाली वास निर्माण करुन डासांना पळवून लावते.
वाळलेल्या चहाच्या पानांमध्ये टॅनिन असते. लवंग आणि दालचिनीसह ते जाळल्यावर धूर निर्माण होतो. मोहरीचे तेल देखील यामध्ये टाकल्याने त्याच्या वासामुळे डासांना दूर ठेवता येते. व्हिडीओ पहा