पुढारी वृत्तसेवा
कानात सतत गुणगुणणे, शिटी वाजल्यासारखा किंवा भुणभुण असा आवाज येणे याला वैद्यकीय भाषेत 'टिनिटस' म्हणतात.
जेव्हा आपल्या कानाच्या आतील नाजूक पेशी खराब होतात, तेव्हा मेंदू स्वतःच आवाज तयार करू लागतो. वाढते वय किंवा मोठा आवाज यांमुळे या पेशींचे नुकसान होते.
अनेकांना बहिरेपणा जाणवण्याआधी कानात आवाज येऊ लागतो. गर्दीच्या ठिकाणी समोरील व्यक्तीचे बोलणे समजण्यात अडचण येऊ लागते.
या त्रासामुळे झोप न येणे, एकाग्रता भंग होणे आणि चिडचिड वाढू शकते. ज्येष्ठ नागरिकांमध्ये यामुळे नैराश्य आणि तोल जाण्याचा धोकाही वाढतो.
तासनतास इयरफोनवर गाणी ऐकणे, ट्रॅफिकचा आवाज, कारखान्यांमधील यंत्रे किंवा फटाक्यांचे मोठे आवाज यांमुळे कानाचे गंभीर नुकसान होते.
८५ डेसिबलपेक्षा जास्त मोठ्या आवाजाच्या ठिकाणी जाणे टाळा. आवश्यक असल्यास 'इयर प्लग्ज'चा वापर करा आणि इयरफोनचा आवाज कमी ठेवा.
टिनिटस पूर्णपणे बरा होत नसला, तरी 'हियरिंग एड' किंवा 'साउंड थेरपी'च्या मदतीने हा त्रास नक्कीच कमी करता येतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने 'हियरिंग टेस्ट' करून घ्या.