Namdev Gharal
सामान्य माणसाला एखादा विषारी साप चावला आणि जर वेळेत उपचार नाही मिळाले तर त्याचा मृत्यू होतो, पण याला अपवाद ठरला टिम फ्रीडे
पण अमेरिकेत एक आख्यायिका बनलेला व्यक्ति राहतो तो म्हणजे टीम फ्रीडे (Tim Friede) या व्यक्तीला जगातील सर्व प्रकारच्या विषारी सापांनी दंश केला आहे तोही तब्बल २०० वेळा, यामध्ये किंग कोब्रा, ब्लॅक मांबा अशा अतिजहाल सापांचा समावेश आहे
याला पॉइझन मॅन असे संबोधतात. टिम फ्रीडे (Tim Friede) अमेरिकेच्या विस्कॉन्सिनमध्ये राहतो. ज्याने मृत्यूला अक्षरशः थट्टा बनवून सोडले आहे. आजही तो सुरक्षित आणि जिवंत आहे.
टिमने स्वतःच्या शरीरावर केलेल्या एका अजब प्रयोगांतर्गत तब्बल २०२ वेळा विषारी सापांचे दंश अंगावर झेलले आहेत. इतकेच नाही, तर त्याने स्वतःच्या शरीरात ८०० पेक्षा जास्त वेळा सापांचे विष इंजेक्शनद्वारे टोचून घेतले आहे.
या पाठीमागचे रहस्य म्हणजे टिमने अनेक वर्षे घेतलेल्या विषाच्या लहान डोसमुळे त्याच्या रक्तामध्ये कमालीची प्रतिकारशक्ती (Immunity) तयार झाली. त्यामुळे तो हे अतिजहाल विष सहन करु शकला.
त्यानंतर त्याने जगातील सर्वात विषारी सापांच्या विषावर मात करू शकणारे 'युनिव्हर्सल अँटी-व्हेनम' (Universal Antivenom - सर्व सापांवर चालणारे एकच औषध) तयार करण्यासाठी टिमने स्वतःच्या शरीराला प्रयोगशाळा बनवले.
१९६८ मध्ये जन्मलेला टिम फ्रीडे सध्या ५८ वर्षांचा आहे. इतकी वर्षे शरीरात विष घेऊनही तो पूर्णपणे निरोगी आणि तंदुरुस्त आहे.
२०२५ मधील एका महत्त्वपूर्ण संशोधनानुसार, शास्त्रज्ञांनी टिमच्या रक्तातील अँटीबॉडीजचा वापर करून एक औषध तयार केले आहे, जे जगातील अनेक घातक सापांच्या विषाला निकामी करण्यास सक्षम ठरत आहे.
टिमने २०१८ मध्ये स्वतःला साप चावून घेण्याचे प्रयोग थांबवले आहेत. सध्या तो कॅलिफोर्नियातील 'सेंटिव्हॅक्स' (Centivax) या नामांकित बायोटेक कंपनीमध्ये सर्पविज्ञान संचालक) म्हणून काम करत आहे.
साप चावण्याच्या प्रयोगामध्ये २००१ मध्ये एकाच रात्री त्याला दोन वेगवेगळ्या कोब्रा (Cobra) सापांनी दंश केला होता, ज्यामुळे तो ४ दिवस कोमात गेला होता.
टिमचे लिव्हर आणि किडनी आजही पूर्णपणे व्यवस्थित काम करत आहेत. मात्र, शास्त्रज्ञ आणि टिम स्वतः लोकांना असा कोणताही जीवघेणा प्रयोग स्वतःवर न करण्याचा इशारा देतात.