पुढारी वृत्तसेवा
हिवाळ्यात या भाज्यांचे सेवन जास्त होते, मात्र कच्च्या स्वरूपात घेतल्यास त्या थायरॉईड हार्मोनच्या कार्यात अडथळा आणू शकतात.
सोयामधील घटक थायरॉईड औषधांचे शोषण कमी करू शकतात, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय टाळलेले बरे.
हिवाळ्यात गोड खाण्याची सवय वाढते, पण साखरेमुळे वजन वाढून थायरॉईडचे संतुलन बिघडू शकते.
बिस्किटे, ब्रेड, केक, पेस्ट्री यामुळे सूज, थकवा आणि वजनवाढीच्या तक्रारी वाढतात.
थंड पदार्थांमुळे मेटाबॉलिझम मंदावतो, जो आधीच थायरॉईड रुग्णांमध्ये कमी असतो.
हिवाळ्यात गरम चहा-कॉफीचे प्रमाण वाढते, पण अती कॅफिनमुळे घाबरटपणा व हृदयाचे ठोके वाढू शकतात.
समोसे, भजी, फ्रेंच फ्राइज यामुळे वजन झपाट्याने वाढू शकते, जे थायरॉईडसाठी धोकादायक आहे.
आयोडीन आवश्यक असले तरी त्याचा अतिरेक केल्यास थायरॉईड ग्रंथीवर परिणाम होऊ शकतो.
हिवाळ्यात मद्यपानाचे प्रमाण वाढते, पण यामुळे थायरॉईड हार्मोन्सचे संतुलन बिघडते.