अमृता चौगुले
उन्हाळा सुरू झाला की उकाडयासोबतच डासांचा त्रासही मोठ्या प्रमाणात वाढतो. संध्याकाळी तर हा त्रास जास्तच वाढत जातो.
अनेक Mosquito repelant वापरूनही हा त्रास कमी होत नसेल तर हे सोपे घरगुती उपाय जरूर करून पहा. घरातील सोपे पदार्थ वापरुन हा त्रास तुम्ही कमी करू शकता.
यासाठी अर्धा चमचा लवंग आणि तेवढेच लसणाची पेस्ट बनवा. एक ग्लास पाण्यात मिसळा. हे पाणी गाळणीतून गाळून घ्या. हे पाणी स्प्रेच्या सहाय्याने घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडा.
लसूण नसेल तर लवंगच्या सहायानेही डासांना पळवून लावणे शक्य आहे. अखंड लवंग घ्या. ते पाण्यात उकळवून घ्या. थंड झाल्यावर ते पाणी कोपऱ्यात स्प्रे करा.
याशिवाय नुसत्या लसणाच्या सहाय्यानेही डासांना पळवून लावू शकतो. लसूण पाण्यात उकळवून घ्या. थंड झाल्यावर ते पाणी घरच्या कोपऱ्यात, अंधाऱ्या जागी स्प्रे करा.