Namdev Gharal
अमेरिका (USA) या देशात सर्वाधिक मांस खाल्ले जाते या देशातील सुमारे ९७% लोक मांसाहारी आहेत. प्रामुख्याने हॅमबर्गर, स्टेक, फ्राइड चिकन, टर्की रोस्ट हे पदार्थ लोकप्रिय आहेत.
ऑस्ट्रेलिया मध्ये ही जवळपास सुमारे ९५% लोक मांसाहार करतात यामध्ये बीफ, लॅम्ब, चिकन याचा समावेश असतो याठिकाणचे लोकप्रिय पदार्थ म्हणजे बीफ स्टेक, लॅम्ब चॉप्स इत्यादी.
अर्जेंटिनामध्ये मोठ्या प्रमाणात बीफ खाले जाते. Asado (बीफचे बार्बेक्यू), स्टेक हे पदार्थ आवडीने खाल्ले जातात. येथील ९४ टक्के लोकसंख्या मांसाहार करते.
ब्राझीलमध्ये सुमारे ९६% लोक मांसाहारी असून याठिकाणी बीफ, चिकनचे Churrasco (बार्बेक्यू), Feijoada (पोर्क व बीन्सची डिश) पदार्थ पंसत केले जातात.
जर्मनीत ८९% लोक मांसाहारी आहेत याठिकाणी पोर्कचे मांस जास्त प्रमाणात खाल्ले जाते. सॉसेजेस (Bratwurst) लोकांना खूप आवडतात.
स्पेनमध्ये पोर्क, सी-फूड Jamón (सुकवलेले पोर्क), Paella (सी-फूड राईस) या पदार्थांना खूप मागणी असते. याठिकाणी ९० टक्के जनता मांसाहार करते.
फ्रान्समध्ये सी-फूड, बीफ हे मांस खाल्ले जाते येथील लोकप्रिय पदार्थ म्हणजे बीफ स्ट्यू (Boeuf Bourguignon), डक कॉन्फिट, सी-फूड प्लेटर्स इत्यादी. ९०% लोकसंख्या मांसाहारी आहे.
चीन मध्ये पोर्क, चिकन, डक यांची मागणी असते. Peking Duck, पोर्क डंपलिंग्स, चिकन फ्राय हे पदार्थांना मागणी असते ९३% लोक मांसाहार करतात.
मेक्सिकोत ८८% लोक मांसाहारी आहेत बीफ, पोर्क, चिकन खाले जाते, टॅकोस, बुरिटोस, Carnitas (पोर्क) हे पदार्थ लोक चवीने खातात.
जपान या देशात सुमारे ९२% लोक मांसाहारी आहेत. येथील लोक सी-फूड, फिश, चिकन मोठ्या प्रमाणात खातात सुशी (मासे), Yakitori (ग्रिल्ड चिकन), हे पदार्थ लोकप्रिय आहेत.