अंजली राऊत
योग्य वेळी शस्त्रक्रिया करणे हेच चांगले आहे. मोतीबिंदूची होण्यामागे सुरुवातीची लक्षणे ओळखा, तुम्हाला मोतीबिंदू होत आहे की नाही हे कसे कळेल?
तुम्हाला वस्तू अस्पष्ट दिसू लागल्या आहेत का ? वस्तू स्पष्टपणे पाहण्यासाठी डोळ्यांवर खूप ताण येतोय का ?
रात्रीच्या वेळी पाहण्यासाठी जास्त अडचणी येऊ शकतात. साधारणपणे, डोळे रात्रीच्या वेळी किंवा अंधाराशी जुळवून घेतात, परंतु मोतीबिंदू असल्यास पाहण्याकरीता अडथळे येतात
खूप तेजस्वी प्रकाशाचा थोडासा भाग देखील डोळ्यांना असह्य होऊ शकतो, अगदी फ्लॅश देखील डोळ्यांना त्रासदायक होतो
प्रकाशाची संवेदनशीलता जाणवेल, मोतीबिंदू असलेल्या व्यक्तीला गोष्टी स्पष्टपणे पाहण्यासाठी जास्त प्रकाशाची आवश्यकता असते.
जेव्हा मोतीबिंदू तयार होतो तेव्हा कोणत्याही प्रकारच्या लाईटच्या जवळ प्रभामंडळ (Halos around light) दिसतात.
चष्मा किंवा लेन्सच्या संख्येत वारंवार आणि खूपच लवकर बदल होत राहणे हे देखील मोतीबिंदू असल्याचे सांगते
जेव्हा मोतीबिंदू डोळ्यातील बाहुलीला झाकतो तेव्हा वस्तू केवळ अस्पष्टच दिसत नाहीत तर सावल्यांसह दुहेरी देखील दिसतात
आजही, मोतीबिंदूवर शस्त्रक्रिया हा एकमेव उपचार आहे. पूर्वीच्या तुलनेत तंत्रज्ञानात लक्षणीय प्रगती झाली आहे. त्यामुळे डोळ्यांची ही प्रक्रिया कमी भीतीदायक आणि खूपच सोपी व सुरक्षित झाली आहे