डासांच्या भुणभुणीला वैतागलाय.. 'या' ठिकाणी नाही एकही डास!

पुढारी वृत्तसेवा

मलेरियासारख्या जीवघेण्या आजारांचा फैलाव करणारा हा कीटक जगभरातील लोकांना वैताग आणणारा आहे.

जगभरात काही अशी ठिकाणे आहेत, जिथे डासांचा त्रास नाही.

यापैकी दोन प्रमुख ठिकाणे म्हणजे आईसलँड आणि अंटार्क्टिका.

याचे मुख्य कारण आईसलँड मधील असामान्य हवामान आणि पर्यावरणीय परिस्थिती आहे.

डास नैसर्गिकरित्या कधीही आईसलँडमध्ये स्थलांतरित झाले नाहीत.

डासांना प्रजननासाठी आवश्यक असलेले उष्ण, साचलेले पाणी आईसलँडमध्ये नाही.

आईसलँडचे थंड हवामान आणि योग्य प्रजनन परिस्थितीचा अभाव यामुळे जरी डास बाहेरून आले, तरी त्यांचे जीवनचक्र पूर्ण करणे त्यांना कठीण जाते.

मानवी प्रवासातून डास तिथे येऊ शकतात; परंतु ते दीर्घकाळ टिकणार नाहीत.

अंटार्क्टिका हे देखील जगातील त्या ठिकाणांपैकी एक आहे जिथे डास नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे तेथील अत्यंत थंड हवामान.