दुबईतले जगातील सर्वात उंच नवे हॉटेल पाहिले का?

पुढारी वृत्तसेवा

संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई शहर हे आता ‘नवलाईचे नगर’ बनलेले आहे.

समुद्रातील पाम वृक्षाच्या आकारातील कृत्रिम बेट व त्यावरील इमारती.

जगातील सर्वात उंच इमारत असलेली ‘बुर्ज खलिफा’

वाळवंटात फुलवलेली जगातील सर्वात मोठी फुलबाग ‘मिरॅकल गार्डन’

एक हॉटेल बांधण्यात आले आहे, जे जगातील सर्वात उंच हॉटेल ठरत आहे.

दुबईमध्ये नोव्हेंबर 2025 मध्ये ‘सिएल दुबई मरीना’ हॉटेलचे दरवाजे लोकांसाठी उघडणार आहे.

येथे 82 मजल्यांवरही खोल्या असतील. हे जगातील सर्वात उंच हॉटेल बनेल.

अख्खं हॉटेल पूर्णपणे काचेचे डिझाईन केलेले असून, येथून लोकांना पाम जुमेराह आणि अरबी आखाताचे द़ृश्य पाहायला मिळेल.

या हॉटेलमध्ये 7 रेस्टॉरंटस्, 61 व्या मजल्यावर एक लक्झरी स्पा आणि जगभरातील पाहुण्यांसाठी सर्वोत्तम सुविधा असतील.