Namdev Gharal
जगात काही ठिकाणे अशी असतात की ज्यांच्या विषयी रहस्यांची वलये कायम असतात. या ठिकाणांचा शास्त्रज्ञांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला असला तरी काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.
बर्म्युडा ट्रँगल : Bermuda Triangle
हा अमेरिकाज व वेस्ट इंडिंज बेटांजवळील समुद्राचा एक भाग जगासाठी नेहमीच सर्वात मोठे रहस्य आहे. उत्तर अटलांटिक महासागरातील हा भाग जहाजे आणि विमाने गायब होतात. यावर अनेकवेळा संशोधन झाले पण ठोस कारण सापडलेले नाही
स्टोनहेंजचे रहस्य Stonehenge
इंग्लडमध्ये असलेल्या या ठिकाणी हजारो वर्षांपूर्वी उभारलेल्या विशाल दगडांची रचना अनेकांसाठी आकर्षण असते. हे स्मारक नेमके कोणी आणि कसे बांधले याबद्दल अजूनही चर्चा सुरू आहे. मानवाला हे शक्य होते का अशीही चर्चा होते
नाझका लाइन्स Nazca Lines
पेरु देशाच्या दक्षिणेकडील वाळवंटात काढलेल्या प्रचंड आकारांच्या आकृत्या आकाशातून स्पष्ट दिसतात, त्यामुळे त्यांचा उद्देश काय होता याबद्दल अनेक तर्क आहेत. इतक्या विशाल आकृत्या कोरल्या कशा हा प्रश्न अनुत्तरीत आहेत
ईस्टर आयलंड Easter Island
ईस्टर आयलंड हा चिलीचा एक विशेष प्रदेश आहे. आग्नेय पॅसिफिक महासागरात वसलेले हे दुर्गम बेट आहे. येथे असलेल्या विशाल मोआई (Moai) पुतळ्यांसाठी हे बेट प्रसिद्ध आहे. हे पुतळे कसे हलवले गेले आणि का उभारले गेले, हा अभ्यासाचा विषय आहे.
एरिया 51, Area 51 आणि UFO
अमेरिकेतील अत्यंत गुप्त लष्करी क्षेत्र आहे. UFO आणि परग्रहवासीयांबाबतच्या अनेक कथांमुळे हे ठिकाण प्रसिद्ध झाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा नुकताच एका एलियनसोबतचा फोटो प्रसिद्ध झाला. हा येथील होता असे म्हणतात
नरकाचे दार Door to Hell
सतत जळणारा प्रचंड गॅस खड्डा हा तुर्कमेनिस्तानमध्ये आहे. नैसर्गिक वायूचा हा प्रचंड साठा, जो सतत जळत असतो, हा काराकुम वाळवंटाच्या मध्यभागी वसलेला आहे. 1971 पासून हा खड्डा पेटलेला असल्याचे मानले जाते. याचे रहस्य अजूनही सुटलेले नाही
माचू -पिचू Machu Picchu
माचू पिचू हा दक्षिण अमेरिकेतील पेरू या देशात स्थित आहे. इंका संस्कृतीचा हा प्राचीन गड कुस्को प्रदेशातील अँडीज पर्वतरांगेत उंचावर वसलेला आहे. इतक्या दुर्गम ठिकाणी अशी भव्य रचना कशी उभारली गेली याचे आश्चर्य वाटते.
Great Pyramid of Giza
इजिप्तमधील प्राचीन जगातील सात आश्चर्यांपैकी एक. गिझाचा ग्रेट पिरॅमिड या पिरॅमिडचे बांधकाम आजही रहस्य बनलेले आहे कारण आधुनिक यंत्रांशिवाय इतकी अचूक रचना कशी उभारली गेली याबद्दल आजही संशोधन सुरू आहे.
लेक नॅट्रॉन Lake Natron
लेक नॅट्रॉन हे उत्तर टांझानियामध्ये, पूर्व आफ्रिकेतील 'ग्रेट रिफ्ट व्हॅली'मध्ये आणि केनियाच्या सीमेजवळ स्थित आहे. या तलावाच्या पाण्यातील खनिजांमुळे काही प्राणी दगडासारखे दिसू लागतात. त्यामुळे हा तलाव अनेक रहस्यमय कथांचा भाग बनला आहे.
आओकिगाहारा जंगल Aokigahara Forest
'वृक्षांचा समुद्र' (जुकाई) म्हणूनही ओळखले जाणारे आओकिगाहारा जंगल जपानमध्ये स्थित आहे अलिकडच्या वर्षांत, हे "सुसाइड फॉरेस्ट" म्हणून ओळखले जाते. येथे खूप लोक आत्महत्या करतात याचे कारण मात्र कोणालाच समजलेले नाही