पुढारी वृत्तसेवा
हिवाळ्यात त्वचेची समस्या
हिवाळ्यातील थंड व कोरडी हवा त्वचा रूक्ष करून चेहरा निस्तेज बनवते.
प्रत्येक महिलेला हवी असते चमकदार त्वचा
चेहऱ्यावर कायम नैसर्गिक ग्लो आणि गुलाबी गाल असावेत, अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते.
नैसर्गिक उपाय हवा आहे का?
पुन्हा चेहऱ्यावर चमक हवी असेल, तर आहारात या खास सूपचा समावेश करायलाच हवा.
गाजर-टोमॅटोचे सूप
हे सूप चविष्ट तर आहेच, पण आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी फायदेशीर आहे.
टोमॅटोचे पोषणमूल्य
टोमॅटोमध्ये लायकोपिन तसेच व्हिटॅमिन A, C आणि K भरपूर प्रमाणात असतात. जे त्वचा तरूण ठेवतात.
गाजरातील बीटा कॅरोटीन
गाजरातील बीटा कॅरोटीन त्वचेला नैसर्गिक उजळपणा देण्यास मदत करते.
सूप बनवण्यासाठी गाजर आणि टोमॅटोला मंद आचेवर शिजवून घ्यायचे. नंतर मिक्सरमध्ये बारीक करायचे. कढईत थोडे तेल टाकून शिजवायचे. चवीनुसार सैंधव मीठ घालायचे.
शरीर डिटॉक्स करण्यात उपयुक्त
गाजर आणि टोमॅटो शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करतात.
वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. तज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्रयोग करणे उत्तम.