Namdev Gharal
भारतीय अध्यात्माचे पाश्चात देशात खूप चाहते आहेत, जीवनाचा खरा अर्थ आणि शांततेची अनुभूती अध्यात्मात मिळते. याच अध्यात्माच्या शोधात आलेल्या ‘द बिटल्स’ व ॠषीकेषमधील ८४ कुटीया याविषयी जाणून घेऊया
ऋषिकेशच्या जंगलातील रहस्यमय असणाऱ्या या ८४ कुटीया या मानवाची ८४ लक्ष योनीतून मुक्ती मिळवण्यासाठी तयार केल्या होत्या, यालाच The Beatles Ashram असेही म्हणतात
जगप्रसिद्ध 'द बीटल्स'चा अध्यात्मिक प्रवास आणि अमर संगीताची जन्मभूमी म्हणूनही या ठिकाणाची ओळख आहे. याठिकाणाहून बीटल्स बँडने या तब्बल ४० हून अधिक गाणी रचली.
त्यांचा जगप्रसिद्ध ‘द व्हाईट अल्बम’ (The White Album) मधील बहुतांश गाणी याच निसर्गरम्य शांततेत तयार झाली होती.
ते येथे महर्षी महेश योगी यांच्याकडून भावातीत ध्यान शिकण्यासाठी The Beatles या रॉक बॅन्डचे जॉन लेनन, पॉल मॅककार्टनी, जॉर्ज हॅरिसन आणि रिंगो स्टार—फेब्रुवारी १९६८ मध्ये येथे राहायला आले होते.
साधकांना ध्यानासाठी शांतता मिळावी म्हणून येथे नदीच्या नैसर्गिक दगडांचा वापर करून ८४ स्वतंत्र घुमटाकार झोपड्या (Meditation Caves) बांधल्या गेल्या होत्या
हिंदू मान्यतेनुसार ८४ लाख योनींमधून मुक्ती मिळवणे किंवा कुंडलिनी चक्रांशी संबंधित ८४ संकल्पनेवर या कुटियांची रचना आधारित आहे
गंगा नदीच्या गोट्यांपासून बनवलेल्या या दुमजली कुटिया आतून अशा प्रकारे डिझाइन केल्या होत्या, जेणेकरून बाहेरचा कोणताही आवाज आत येऊ नये आणि साधकाला एकाग्रतेने ध्यान करता यावे
येथील मुख्य ध्यान हॉलच्या भिंतींवर जगभरातील कलाकारांनी महर्षी महेश योगी, बीटल्स बँड आणि भारतीय संस्कृतीची अप्रतिम ग्राफिटी व चित्रे रेखाटली आहेत, ज्याला 'The Beatles Cathedral Gallery' म्हटले जाते.
हा आश्रम राजाजी राष्ट्रीय उद्यान (Rajaji Tiger Reserve) च्या घनदाट जंगलात आणि गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेला आहे. त्यामुळे येथे अनेक पक्षी आणि वन्यजीवांचा वावर नैसर्गिकरीत्या पाहायला मिळतो
१९९० च्या दशकात महर्षींचा भाडेपट्टा संपल्यानंतर हा आश्रम जंगलात दुर्लक्षित आणि ओसाड पडला होता
डिसेंबर २०१५ मध्ये उत्तराखंड वनविभागाने याचे संवर्धन करून हा परिसर पर्यावरण पर्यटन आणि बीटल्स चाहत्यांसाठी पुन्हा अधिकृतपणे खुला केला