रणजित गायकवाड
वेस्ट इंडीज संघाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील दुसऱ्या सर्वात कमी धावसंख्येची नामुष्कीजनक नोंद केली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत जमैकाच्या सबिना पार्क मैदानावर विंडीजचा संपूर्ण डाव अवघ्या 27 धावांत संपुष्टात आला.
यापूर्वी 1955 मध्ये इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंडचा संघ 26 धावांवर सर्वबाद झाला होता, जो कसोटीतील आजवरचा नीचांक आहे.
वेस्ट इंडीजने आता या लाजिरवाण्या विक्रमाच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे.
ऑस्ट्रेलियाने हा सामना तब्बल 176 धावांनी जिंकला.
26 धावा : विरुद्ध इंग्लंड (1955)
27 धावा : विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2025)
30 धावा : विरुद्ध इंग्लंड (1896)
30 धावा : विरुद्ध इंग्लंड (1924)
35 धावा : विरुद्ध इंग्लंड (1899)