रणजित गायकवाड
भारतीय क्रिकेट संघाने ओव्हल कसोटी सामन्यात इंग्लंड क्रिकेट संघाचा ६ धावांनी पराभव केला आणि अँडरसन-तेंडुलकर चषक मालिका २-२ अशा बरोबरीत सोडवली.
भारताच्या या रोमहर्षक विजयाचा नायक मोहम्मद सिराज ठरला. त्याने सामन्यात एकूण ९ बळी घेतले. त्याने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात ५ बळी टिपले.
या निमित्ताने, 'सेना' (SENA) देशांमधील (द. आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) विजयांमध्ये एका डावात सर्वाधिक वेळा 5 बळी घेणाऱ्या आशियाई वेगवान गोलंदाजांविषयी जाणून घेऊया.
जसप्रीत बुमराह हा 'सेना' देशांमध्ये सर्वाधिक वेळा ५ बळी घेणाऱ्या आशियाई गोलंदाजांपैकी एक आहे.
बुमराहने आतापर्यंत या देशांमध्ये ३४ कसोटी सामने खेळले असून, २१.४६ च्या उत्कृष्ट सरासरीने एकूण १५९ बळी घेतले आहेत.
यादरम्यान त्याने ११ डावांमध्ये ५ किंवा त्याहून अधिक बळी घेण्याची कामगिरी केली आहे.
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याने 'सेना' देशांमध्ये ५ वेळा संघाच्या विजयात पाच बळी घेण्याची कामगिरी केली.
त्याने ३२ कसोटी सामन्यांत १४६ बळी घेतले. असून एकूण ११ डावांमध्ये पाच बळी घेण्याचा पराक्रम केला.
सिराजने 'सेना' देशांमध्ये ४ वेळा संघाच्या विजयात पाच बळी घेण्याची कामगिरी केली आहे.
त्याने २३ सामन्यांत ३१.०४ च्या सरासरीने ९१ बळी घेतले आहेत. तो इंग्लंडशिवाय ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत प्रत्येकी एकदा पाच बळी घेण्यात यशस्वी ठरला आहे.
या यादीत पाकिस्तानचा वकार युनिस, शोएब अख्तर आणि इम्रान खान यांचाही समावेश आहे. या तिन्ही गोलंदाजांनी 'सेना' देशांमधील विजयांमध्ये प्रत्येकी ३ वेळा पाच बळी घेण्याची कामगिरी केला.