Tender Coconut Water : डायबेटिक लोक नारळपाणी पिऊ शकतात का?

पुढारी वृत्तसेवा

डायबेटिस असणारे लोक मर्यादित प्रमाणात नारळ पाणी पिऊ शकतात. नारळ पाणी पूर्णपणे निषिद्ध नाही, परंतु ते पिताना रक्तातील साखरेची पातळी आणि काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.

एका शहाळ्यात २४० ते २५० मिली साखर असेल तर त्‍यामध्ये साधारणपणे ६ ते ९ ग्रॅम साखर असू शकते, पण ही फ्रुक्टोज, ग्लुकोज आणि सुक्रोज प्रकारची नॅचरच साखर असते

डायबेटिस असणाऱ्यांचा विचार केला. तर हे लोक नारळ पाणी पिऊ शकतात, मात्र ते कमी प्रमाणात पिणे गरजेचे आहे. दिवसातून फक्त एकदाज अर्धा ते एक कप (१५० ते २०० मिली) घ्यावे. यापेक्षा जास्त पाणी पिऊ नये.

कमी ग्लायसेमिक इंडेक्स: नारळ पाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी ते मध्यम (सुमारे ५० ते ५४) असतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वेगाने वाढत नाही.

कमी ग्लायसेमिक लोड: एका नारळाच्या पाण्याचा ग्लायसेमिक लोड साधारण ३ ते ४ असतो. त्यामुळे योग्य प्रमाणात प्यायल्यास रक्तातील ग्लुकोजवर फार मोठा ताण येत नाही.

इन्सुलिनसाठी फायदेशीर मॅग्नेशियम: नारळ पाण्यात मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. हे खनिज शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यास आणि साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

नेहमी ताज्या हिरव्या शहाळ्याचेच पाणी प्यावे. बाजारातील बाटलीबंद किंवा पॅकबंद नारळ पाणी टाळावे, कारण त्यात अतिरिक्त साखर व केमिकल्स असतात.

शहाळ्याची मलाई खाणे टाळा: नारळाच्या आतील मऊ मलाईमध्ये फॅट्स आणि कॅलरीचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे डायबेटिक रुग्णांनी मलाई न खाता केवळ पाणी पिणे योग्य ठरते.

नारळ पाणी सकाळी किंवा हलका व्यायाम केल्यावर पिणे सर्वात चांगले असते. जेवणासोबत किंवा जेवणानंतर लगेच पिणे टाळावे.

मधुमेहामुळे किडनीचा आजार असल्यास नारळ पाणी पिणे पूर्णपणे टाळावे किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यातील जास्त पोटॅशियम किडनीसाठी त्रासदायक ठरू शकते.

रक्तातील साखरेची पातळी सतत खूप जास्त किंवा अनियंत्रित राहत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय नारळ पाणी पिऊ नये.