Hair Health Tips : मेहंदीमध्ये चहा पावडर की कॉफी? पांढऱ्या केसांसाठी काय आहे जास्त फायदेशीर

पुढारी वृत्तसेवा

केसांना नैसर्गिक चमक आणण्यासाठी आणि पांढरे केस लपवण्यासाठी मेहंदी हा एक उत्तम आणि सुरक्षित घरगुती उपाय आहे.

मेहंदी भिजवताना त्यात चहा पावडर टाकावी की कॉफी, असा प्रश्न अनेकांना पडतो. दोघांचेही केसांना वेगवेगळे फायदे मिळतात.

मेहंदीत चहा पावडरचे पाणी मिसळल्याने केसांना मुळापासून मजबुती मिळते आणि केसांना एक नैसर्गिक चमक (Shine) येते.

१ कप पाण्यात १ ते २ चमचे चहा पावडर घालून चांगले उकळवून घ्या. पाण्याला गडद रंग आल्यावर गॅस बंद करा आणि हे पाणी थंड होऊ द्या.

जर तुम्हाला केसांवर मेहंदीचा लालसर रंग नको असेल, तर कॉफी पावडर वापरा. यामुळे केसांना सुंदर डार्क ब्राऊन शेड मिळतो.

होय! पांढऱ्या केसांवर गडद आणि परफेक्ट ब्राऊन रंग हवा असल्यास चहा पावडरचे पाणी आणि कॉफी दोन्ही एकत्र मेहंदीमध्ये मिसळू शकता.

चहाच्या उकळलेल्या पाण्यात मेहंदी भिजवा आणि त्यात १ चमचा कॉफी पावडर घाला. हे मिश्रण १५-२० मिनिटे तसेच राहू द्या.

तयार केलेली ही पेस्ट केसांवर व्यवस्थित लावा आणि चांगल्या रंगासाठी किमान २ ते ३ तास केसांवर तशीच राहू द्या.

उन्हाळ्यात किंवा पंख्याच्या हवेमुळे मेहंदी लवकर सुकते आणि पूर्ण रंग चढत नाही. यासाठी मेहंदी लावल्यानंतर डोक्यावर शॉवर कॅप (Shower Cap) नक्की घाला.

मेहंदी धुताना फक्त साध्या पाण्याचा वापर करा. मेहंदी धुतल्यानंतर लगेच शॅम्पू लावू नका, जेणेकरून रंग केसांवर जास्त काळ टिकून राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.