Namdev Gharal
तामिळनाडूतील सालेम जिल्ह्यातील मल्लामुप्पमपट्टी या भागात एलियनचे हे अनोखे मंदिर उभारण्यात आले आहे.
तामिळनाडूच्या सालेम जिल्ह्यातील मल्लामुप्पमपट्टी भागात हे मंदिर आहे. या मंदिराची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा असून ते भारतातील पहिले एलियन मंदिर असल्याचा दावा केला जातो.
११ फूट जमिनीखाली मूर्तीया मंदिराचे सर्वात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे एलियनची काळ्या रंगाची मूर्ती जमिनीखाली ११ फूट खोल तळघरात ठेवण्यात आली आहे. यासाठी छोटा खिडकीवजा दरवाजा तयार केला आहे
हे मंदिर सिद्धर बाकीया नावाच्या व्यक्तीने उभारले आहे. त्यांचा दावा आहे की, त्यांना एलियनशी सूक्ष्म/मानसिक रूपात संपर्क साधता आला होता.
सिद्धर बाकीया (उर्फ लोगनाथन) यांनी हे एलियनचे मंदिर २०२४ च्या सुरवातील उभारले असून, मंदिराचे व्हिडिओ आणि माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ते देशभरात प्रसिद्धीझोतात आले.
लोगनाथन यांचा दावा आहे की, त्यांनी हे पाऊण एकर जमिनीवर मंदिर बांधले असून त्यांनी एलियन्सकडून मंदिर बांधण्यापूर्वी परवानगी घेतली होती. तसेच या मंदिरात अगस्त्य ॠषीची मूर्तीही आहे
लोगनाथन यांचा दावा आहे की, एलियन्स हे भगवान शिवाने निर्माण केलेले पहिले देव होते आणि त्यांच्यामध्ये जगाला संकटांपासून वाचवण्याची शक्ती आहे.