Tamarind Seeds Benefits: चिंचेच्या बियांचे आरोग्यासाठी ७ चमत्कारी फायदे!

पुढारी वृत्तसेवा

आपण चिंच खाल्ल्यानंतर त्याच्या बिया (चिंचोके) फेकून देतो. मात्र, या बिया आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहेत.

देशी चिंचेच्या बियांमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन 'सी' आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात.

१. पचनक्रिया सुधारते

चिंचेच्या बियांची पावडर करून घेतल्यास पचनशक्ती मजबूत होते. गॅस, बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटी यांसारख्या पोटाच्या तक्रारी दूर होतात.

२. सांधेदुखीपासून आराम

आयुर्वेदानुसार, चिंचेच्या बियांची पेस्ट करून सांध्यांवर लावल्यास संधिवात आणि तीव्र सांधेदुखीपासून मोठा दिलासा मिळतो.

३. रोगप्रतिकारक शक्ती वाढते

व्हिटॅमिन 'सी'ने समृद्ध असलेल्या या बिया शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. याचे चूर्ण पाण्यात विरघळवून घेता येते.

४. वजन नियंत्रणात उपयुक्त

चिंचोक्यांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते. यातील विशिष्ट घटक पोटाची चरबी कमी करण्यास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास फायदेशीर ठरतात.

Weight Loss | file photo

५. पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या वाढवते

डॉक्टरांच्या दाव्यानुसार, चिंचेच्या बियांमध्ये असे घटक असतात जे पुरुषांची शारीरिक ताकद वाढवण्यासोबतच शुक्राणूंची संख्या वाढवण्यास मदत करतात.

६. त्वचेच्या विकारांवर गुणकारी

त्वचेच्या विविध आजारांवर चिंचेच्या बिया रामबाण ठरतात. या बियांच्या पावडरमध्ये लिंबाचा रस मिसळून लावल्यास त्वचाविकार दूर होतात.

७. पुरळांवर आराम

शरीरावर वारंवार पुरळ येत असतील, तर चिंचोक्यांच्या पावडरीची पुरचुंडी हलकी गरम करून शेक द्यावा.

चिंचेच्या बियांची पावडर कशी बनवावी?

चिंचेच्या बिया १-२ दिवस उन्हात चांगल्या वाळवून घ्याव्यात. त्यानंतर त्या फोडून आतील पांढरा भाग बारीक दळून त्याची पावडर बनवावी. बियांचे वरचे काळे टरफले फेकून द्यावे.

आयुर्वेदात चिंचोक्यांचे जितके फायदे सांगितले आहेत, तितकेच त्याचे काही दुष्परिणामही आहेत. त्यामुळे याचा अतिवापर टाळावा.