पाण्यात मीठ टाकून आंघोळ करा... मिळतील आश्चर्यकारक फायदे..

पुढारी वृत्तसेवा

आंघोळीच्या पाण्यात सैधव मीठ चांगले, पण तुम्ही साधेही टाकू शकता. कोमट पाण्यात सॉल्ट बाथ फायदेशीर.

उन्हाळ्यात थंड पाण्यातही सॉल्ट बाथ घेउ शकता.

मीठामध्ये सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम यासरखी मिनरल्स असतात. जी शरीरासाठी फायदेशीर ठरतात.

आंघोळीच्या पाण्यात थोडे मीठ टाकून आंघोळ केल्याने शरीर स्वच्छ होण्यास मदत होते.

शरीरावर जमा झालेल्या मृत पेशी निघुन जाण्यास मदत होते.

काही दिवस मीठाच्या पाण्याने आंघोळ केली तर त्‍वचेवर ग्लो आल्याचे दिसून येते. त्‍वचेवरचे डागही निघुन जातात.

मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने जास्त घाम येउन चरबी कमी होण्यासही मदत होउ शकते.

मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने स्नायूंना आराम मिळतो. त्‍यामुळे थकवा दूर होण्यास मदत होते.

मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने केसातील कोंड्याची समस्या दूरी होते. केस निरोगी आणि चमकदार होतात.