पुढारी वृत्तसेवा
लोकप्रिय मालिका तारक मेहता का उलटा चष्मामध्ये मोठा ट्वीस्ट येणार आहे. शो मध्ये मकर संक्रातीचा सेगमेंट दाखवण्यात येणार आहे.
मात्र हा सोहळा गोकुलधाम सोसायटीत होणार नाही तर जयपूरमध्ये होणार आहे. या दरम्यान मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे.
कथेनुसार पोपटलाल, रूपा आणि रतनलालचे कुटुंबिय, टपू सेना जयपूर पोहोचणार आहेत. इथे पोपटलालच्या लग्नाचा किस्सा होणार आहे.
रूपाला कोणीतरी पोपटलालसाठी एका स्थळाची ऑफर दिलीय. त्यामुळे पोपटलालच्या लग्नासाठी मुलीच्या शोधात सारे जयपूर आले आहेत.
या दरम्यान जयपूरचा प्रसिद्ध पतंग महोत्सव दाखवण्यात येणार आहे. या दरम्यान पोपटलालच्या लग्नाचा अँगल दाखवण्यात येईल्.
मात्र वधू मिळणे इतके सोपे नाही. पोपटलाल समोर एक अट ठेवण्यात आली आहे. त्या मुलीचा पतंग कापला तरच ती मुलगी पोपटलालशी लग्न करणार आहे.
जर असे झाले नाही तर काय पोपटलालचे लग्न होणार नाही? चाहते यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान वधू कोण आहे ते सांगितलेले नाही.
या आधीही मेकर्सनी पोपटलालच्या लग्नाचा ट्रॅक चालवला आहे. मात्र दरवेळी मुलगी त्याचे हृदय तोडते. पाहूया यावेळी काय होते?
शो मध्ये पोपटलालचे पात्र श्याम पाठक करत आहेत. तारक मेहता मालिकेत ते सुरूवातीपासून आहेत.