रणजित गायकवाड
टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणाऱ्या टॉप १० गोलंदाजांपैकी ७ खेळाडू हे फिरकीपटू आहेत.
शाकिब अल हसन (बांगलादेश)
विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक ५० बळी घेणारा शाकिब हा एकमेव आणि अव्वल गोलंदाज आहे.
शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान)
आफ्रिदीने आपल्या फिरकीच्या जोरावर ३९ बळी घेत या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे.
लसिथ मलिंगा (श्रीलंका)
आपल्या भेदक मा-याने मलिंगाने ३८ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला असून तो श्रीलंकेचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.
वानिंदू हसरंगा (श्रीलंका)
हसरंगाने अवघ्या १९ सामन्यांत ३७ बळी घेऊन सर्वांना थक्क केले असून, त्याचा स्ट्राईक रेट (११.७) सर्वात सरस आहे.
राशिद खान (अफगाणिस्तान)
अफगाणिस्तानच्या या फिरकी जादूगाराने २३ सामन्यांत ३७ बळी घेत जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे.
ॲडम झॅम्पा (ऑस्ट्रेलिया)
ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू झॅम्पाने ३६ बळी घेत कांगारूंच्या गोलंदाजीचे नेतृत्व केले आहे.
सईद अजमल (पाकिस्तान)
आपल्या 'दूसरा' चेंडूने फलंदाजांना चकवणारा अजमल ३६ बळींसह पाकिस्तानच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे.
टिम साउदी (न्यूझीलंड)
न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज साउदीने सातत्यपूर्ण गोलंदाजी करत विश्वचषकात ३६ गडी बाद केले आहेत.
एनरिक नोर्किया (दक्षिण आफ्रिका)
अवघ्या १९ सामन्यांत ३५ बळी घेणाऱ्या नोर्कियाचा इकॉनॉमी रेट (५.५५) या यादीत सर्वात कमी आणि प्रभावी आहे.
अजंथा मेंडिस (श्रीलंका)
श्रीलंकेच्या या 'मिस्ट्री' स्पिनरने आपल्या कारकिर्दीत विश्वचषकात ३५ बळी घेण्याचा पराक्रम केला आहे.