रणजित गायकवाड
टी-२० विश्वचषका स्पर्धेत आतापर्यंत ११ फलंदाजांनी ‘शतकी’ धमाका करून क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन केले आहे.
वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने २००७ च्या पहिल्याच विश्वचषकात द. आफ्रिकेविरुद्ध ११७ धावा कुटून टी-२० शतकांचा श्रीगणेशा केला.
२०१० मध्ये सुरेश रैनाने द. आफ्रिकेविरुद्ध १०१ धावांची संस्मरणीय खेळी केली. यासह त्याने टी-२० विश्वचषकात शतक ठोकणारा पहिला भारतीय होण्याचा मान मिळवला.
श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेने २०१० मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध १०० धावांची खेळी करत आपल्या क्लासिक फलंदाजीचे दर्शन घडवले.
२०१२ मध्ये बांगलादेशविरुद्ध मॅक्युलमने १२३ धावांची वादळी खेळी केली, जी दीर्घकाळ विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या होती.
२०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ११६ धावांची नाबाद खेळी करत ॲलेक्स हेल्सने इंग्लंडला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
अहमद शहजादने २०१४ मध्ये बांगलादेशविरुद्ध १११ धावांची नाबाद खेळी करत विश्वचषकात शतक झळकावणारा पहिला पाकिस्तानी फलंदाज ठरला.
२०१६ मध्ये ओमानविरुद्ध १०३ धावांची नाबाद खेळी करून तमिमने बांगलादेशच्या क्रिकेट इतिहासात सोनेरी पान जोडले.
ख्रिस गेलने २०१६ मध्ये वानखेडेवर इंग्लंडविरुद्ध अवघ्या ४८ चेंडूत १०० धावा कुटून विश्वचषकात दोन शतके करणारा एकमेव फलंदाज बनला.
२०२१ मध्ये जोस बटलरने श्रीलंकेविरुद्ध १०१ धावांची नाबाद खेळी करून दाखवून दिले की तो सध्याच्या युगातील सर्वोत्तम फिनिशर का आहे.
२०२२ मध्ये सिडनीच्या मैदानात बांगलादेशविरुद्ध १०९ धावांची आक्रमक खेळी करत दक्षिण आफ्रिकेच्या रिली रुसोने सर्वांचे लक्ष वेधले.
रिली रुसोच्या शतकानंतर अवघ्या दोन दिवसांत न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने श्रीलंकेविरुद्ध १०४ धावांची तुफानी खेळी केली.