रणजित गायकवाड
टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत चेंडूंच्या बाबतीत सर्वात वेगवान 1000 धावा फटकावणा-या फलंदाजांच्या यदीत भारतीय फलंदाजाचा दबदबा आहे.
या यादीत अभिषेक शर्माने मोठी झेप घेतली आहे.
अभिषेक अव्वल स्थानी पोहचला आहे. त्याने ही किमया 528 चेंडूत केली आहे.
या यादीत दुस-या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा टीम डेव्हिड आहे.
डेव्हिडने टी-20 आंतरराष्ट्रीयच्या 1000 धावा 569 चेंडूत पूर्ण केल्या आहेत.
भारताचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव तिस-या स्थानी आहे.
सूर्याने 573 चेंडूत 1000 धावा फटकावल्या आहेत.
इंग्लंडचा फिल साल्ट 599 चेंडूत हजार धावा करून या यादीत चौथ्या स्थानी आहे.
ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेलने 604 चेंडूत 1000 धावा केल्या. तो पाचव्या क्रमांकावर आहे.