पुढारी वृत्तसेवा
दातांवर टार्टर किंवा प्लाक जमल्यामुळे हिरड्यांना सूज येते. या सुरुवातीच्या संसर्गाला 'जिंजीवायटीस' म्हणतात.
संसर्ग वाढल्यास ही सूज 'पेरिओडाँटायटिस'मध्ये बदलते. व्हायरल किंवा फंगल इंफेक्शनमुळेही हिरड्या सुजू शकतात.
काही विशिष्ट पदार्थांची ॲलर्जी किंवा कवळी योग्य न बसल्यास सूज येते. हिरडीला झालेली कोणतीही जखम सूजेचे कारण ठरू शकते.
गरोदरपणात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे हिरड्या सुजण्याची शक्यता असते. शरीरातील उष्णता वाढल्यानेही हिरड्यांवर परिणाम होतो.
दिवसातून २ वेळा दात घसा आणि जेवणानंतर खळखळून चुळ भरा. तंबाखू, गुटखा, मावा, कोल्ड्रिंक्स आणि अतिगोड पदार्थ.
घरगुती उपायांनी तात्पुरता दिलासा मिळतो, पण मूळ समस्या तशीच राहते. योग्य उपचारांसाठी वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या.