भारतीयांच्या भन्नाट ऑर्डर्स! लाखाचे कंडोम्स ते १० रूपयाचे प्रिंटाऊट

Anirudha Sankpal

२०२५ च्या अहवालानुसार, चेन्नईमधील एका ग्राहकाने वर्षात तब्बल २२८ वेळा कंडोम्सची ऑर्डर दिली, ज्याचे एकूण बिल १ लाखांच्या वर गेले.

आळशीपणाचा कळस म्हणजे बंगळुरूमध्ये एका ग्राहकाने घरबसल्या केवळ १० रुपयांच्या प्रिंट आऊटची ऑर्डर इन्स्टामार्टवरून दिली.

एका 'टॉप स्पेंडर' ग्राहकाने वर्षाकाठी २२ लाख रुपयांची खरेदी केली, तर एकाने एकाच ऑर्डरमध्ये ४.३ लाखांचे तीन iPhone 17 मागवले.

नोएडातील एका फिटनेस प्रेमी व्यक्तीने वर्षभरात तब्बल २.८ लाख रुपयांचे केवळ प्रोटीन पावडर ऑर्डर केल्याचे समोर आले आहे.

भारतात चहाचे वेड किती आहे हे यावरून समजते की, इन्स्टामार्टवरून दर सेकंदाला दुधाचे ४ पॅकेट डिलिव्हर करण्यात आले.

रात्रीच्या वेळी भारतीयांना चिप्स खाण्याची सर्वाधिक क्रेझ असून, ९ पैकी १० शहरांत 'पोटॅटो चिप्स' ही लेट नाईट ऑर्डरमध्ये नंबर वन राहिले.

आकडेवारीनुसार, दर १२७ ऑर्डर्सपैकी एका ऑर्डरमध्ये कंडोमचा पॅकेट असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या अहवालावरून स्पष्ट होते की, भारतीय ग्राहक आता किराणा सामानासोबतच महागड्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठीही क्विक कॉमर्सवर अवलंबून आहेत.

छोटी दुकानं जवळ असतानाही वेळेची बचत आणि सुलभतेमुळे लोक अगदी किरकोळ गोष्टींसाठीही डिलिव्हरी ॲप्सचा वापर करत आहेत.

येथे क्लिक करा