Sweet Potato: हिवाळ्यात रताळ्यांना का म्हणतात ‘सुपरफूड’? जाणून घ्या...

Asit Banage

रताळी जितकी चविष्ट असतात, तितकीच पौष्टिकही असतात.

पण रताळे खाण्याचा कोणता काळ हा सुवर्ण असतो, म्हणजेच ज्यामुळे त्याचा शरीराला जास्त फायदा होतो.

रताळ्यांना हिवाळ्यामधील ‘सुपरफूड’ म्हटले जाते. हिवाळ्यात चयापचय क्रिया (मेटाबॉलिझम) वाढवण्यासाठी रताळी उपयुक्त ठरतात.

त्यामध्ये नैसर्गिकरीत्या फायबर, बीटा-कॅरोटिन, पोटॅशियम आणि विविध जीवनसत्त्वे असतात.

रताळ्यांमध्ये बीटा-कॅरोटिन भरपूर प्रमाणात असते. शरीर बीटा-कॅरोटिनचे व्हिटॅमिन ‘ए’मध्ये रूपांतर करते, ज्यामुळे ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

रताळ्यांमध्ये व्हिटॅमिन ‘सी’सुद्धा भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारकशक्ती वाढवते. ते त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे.

हिवाळ्यात जंतुसंसर्ग टाळण्यासाठीही रताळी प्रभावी ठरतात.

रताळ्यांमधील फायबर आणि अँटिऑक्सिडंटस्‌ आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...