Sweet Potato vs Root Vegetables : रताळे आणि कंदमुळे यामध्ये फरक काय?

पुढारी वृत्तसेवा

अनेकदा रताळे आणि सुरणासारखी कंदमुळे याबाबत लोकांचा गैरसमज होतो.

विशेषतः अमेरिकेत या दोन्ही नावांचा वापर एकमेकांऐवजी सर्रास केला जातो.

मात्र, हे दोन्ही एकाच प्रकारचे नसून एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत.

तज्ज्ञांच्या मते, वनस्पतींचे वर्गीकरण, त्यांच्या वाढीची पद्धत आणि पोषण मूल्ये या घटकांमुळे सुरण आणि रताळे एकमेकांपासून वेगळे ठरतात.

हे दोन्ही कंद जमिनीखालीच उगवत असले आणि दिसायला काहीसे सारखे असले, तरी वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीने त्यांच्यात कोणतेही जवळचे नाते नाही.

कारण ते वेगवेगळ्या वनस्पती कुळांमधील आहेत, अशी माहिती दक्षिण कॅरोलिनातील ‘यू. एस. व्हिजिटेबल लॅबोरेटरी’चे जनुकशास्त्रज्ञ फिलिप वाडल यांनी दिली.

रताळे हे ‘मॉर्निंग ग्लोरी’ या वनस्पती कुळातील आहे.

याउलट याम (Dioscorea) हे ‘डायोस्कोरियासी’ (Dioscoreaceae) कुळात मोडते. याम ही ‘एकदल’ वनस्पती आहे, तर रताळे हे ‘द्विदल’ वनस्पती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.