पुढारी वृत्तसेवा
स्वप्नदोष ही समस्या प्रामुख्याने दोन कारणांमुळे उद्भवते. ती वेळीच ओळखून उपाय करणे आवश्यक आहे.
पोट साफ न झाल्यामुळे शरीरात उष्णता वाढते. या उष्णतेच्या प्रभावामुळे झोपेत वीर्यपात होणे म्हणजे स्वप्नदोष होण्याची संभावना असते.
दुसरे कारण म्हणजे स्वप्नात कामुक दृष्ये पाहणे किंवा स्वप्नात कामक्रीडा करणे.
ज्यांना दिवसा कामुक चिंतन करणे, कामुक क्रीडा करणे अशा सवयी असतात, त्यांना स्वप्नात सुद्धा कामुक दृष्य दिसतात व त्यामुळे वीर्यपात होतो.
या रोगापासून बचावाकरिता अशी परिस्थिती निर्मित होऊ न देणे आवश्यक आहे. अन्यथा औषधांचा परिणामकारक उपयोग होणार नाही.
१) बाभळीची नरम पाने ५ ते १० ग्रॅम चांगली चावून खावी. नंतर थंड पाणी प्यावे. २-३ आठवडे हा प्रयोग केल्याने स्वप्नदोषाचा विकार दूर होऊन जाईल.
२) पाव लिटर दुधात ३ खजूर (छुआरे) आणि २ चमचे वाटलेली खडीसाखर घालून ते उकळावे. दूध निम्मे आटल्यावर खजुरातील बिया काढून टाकाव्यात. सकाळी रिकाम्या पोटी खजूर खात-खात हे दूध प्यावे.
३) झोपण्यापूर्वी हात-पाय थंड पाण्याने स्वच्छ धुवावेत. तसेच मल-मूत्र विसर्जन करूनच झोपायला जावे, जेणेकरून शरीरातील उष्णता कमी होईल.
ज्यांना हा त्रास होतो, त्यांनी संध्याकाळी ७ वाजेनंतर गरम दूध पिणे टाळावे.