पुढारी वृत्तसेवा
सुष्मिता सेनची अफाट संपत्ती
आलिशान घर, महागड्या कार्स, हिऱ्यांचा खजिना आणि ललित मोदींचे मोठे खुलासे
भारताची मिस युनिव्हर्स
1994 मध्ये सुष्मिता सेनने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकून इतिहास रचला. आजही ती देशातील सर्वात प्रेरणादायी महिलांपैकी एक मानली जाते.
एकूण संपत्ती किती?
रिपोर्टनुसार, सुष्मिता सेनची एकूण संपत्ती सुमारे 100 कोटी रुपये आहे. अभिनय, जाहिराती, वेब सिरीज आणि व्यवसायातून ती कमाई करते.
मुंबईतील आलिशान घर
मुंबईच्या वर्सोवा परिसरातील तिचे घर साधेपणा आणि लक्झरीचा सुंदर मिलाफ आहे. घरातील प्रत्येक कोपरा तिच्या व्यक्तिमत्त्वाची झलक दाखवतो.
घरात सर्वत्र कलाकृती
सुष्मिताला चित्रकलेची आवड आहे. घरात पेंटिंग्ज, बुद्धांच्या मूर्ती, शिल्पकला आणि विविध कलात्मक वस्तूंनी सजावट करण्यात आली आहे.
मिस युनिव्हर्सच्या आठवणी जपल्या
घराच्या भिंतींवर तिच्या मिस युनिव्हर्स विजेतेपदाच्या आणि मॉडेलिंग कारकिर्दीच्या अनेक दुर्मिळ छायाचित्रांच्या फ्रेम्स आहेत.
फिटनेससाठी खास जागा
सुष्मिताने घरातच खास वर्कआउट झोन तयार केला आहे. एरियल योगा, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि फिटनेसचे व्हिडिओ ती इथूनच शेअर करते.
हिऱ्यांची खास आवड
सुष्मिताने स्वतः सांगितले आहे की ती हिरे भेट म्हणून घेत नाही. स्वतःच्या कमाईतून तिने मोठं डायमंड कलेक्शन तयार केलं आहे.
1.63 कोटींची मर्सिडीज
तिच्या गॅरेजमध्ये Mercedes-AMG GLE53 Coupe, BMW X6, BMW 7 Series, Audi Q7 आणि Lexus LX 470 सारख्या लक्झरी कार्स आहेत.
ललित मोदींचा मोठा खुलासा
ललित मोदी यांनी अलीकडेच सुष्मिताला 'गोल्ड डिगर' म्हणणाऱ्यांना उत्तर देताना म्हटले, "ती स्वतःच्या बळावर श्रीमंत झाली आहे. उलट मीच डायमंड डिगर होतो!"