Surana benefits: पित्त, रक्तदाब ते कर्करोगापर्यंत.., सुरण खाण्याचे असेही फायदे!
पुढारी वृत्तसेवा
सुरणमध्ये (Amorphophallus paeoniifolius) अनेक औषधी गुणधर्म असतात.
सुरणामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असल्यामुळे त्याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते. मूळव्याधाच्या उपचारासाठी ते उत्तम मानले जाते.
यातील नैसर्गिक प्रोबायोटिक्समुळे गॅस, अपचन आणि अॅसिडिटी यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
सुरण मधुमेहींसाठी फायदेशीर आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवून इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यासाठी मधुमेहींनी सुरणाचे सेवन आवर्जुन करावे.
सुरणामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळे तो रक्तदाब नियंत्रित ठेवतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारतो. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासही सुरण लाभदायक ठरतो.
यामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंटस्मुळे फ्री रॅडिकल्सचा नाश होतो आणि कर्करोगापासून संरक्षण मिळते.
सुरण खाण्यामुळे लवकर पोट भरल्यासारखे वाटते आणि अन्नाचे अतिरेकी सेवन टाळले जाते. त्यामुळे तो वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
सुरण कच्चा खाणे टाळावे. तो वाफवून, उकडून किंवा भाजून खाणे अधिक चांगले. सुरणाची भाजी, भरीत किंवा सुरणाचे वडे हे चविष्ट आणि आरोग्यदायी पर्याय आहेत.
काही लोकांना सुरणामुळे अॅलर्जी किंवा घशात खवखव होऊ शकते. थायरॉईड समस्या असलेल्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच सुरण खावे.