Anirudha Sankpal
सध्या सोशल मीडियावर सनस्क्रीन अन् कॅन्सरबाबत अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत.
अनेकांनी सनस्क्रीन लावल्यानं स्कीन कॅन्सरचा धोका कमी होतो असा दावा केला आहे.
तर काही त्याच्या उलट दावा करत आहेत. नेमकं खरं काय आहे... शास्त्रीय अभ्यासात काय निष्कर्ष आले आहेत हे जाणून घेऊयात.
सूर्यप्रकाशातील यूव्ही (UV) किरणे हे डीएनएचे नुकसान करणारे व कॅन्सर निर्माण करणारे ज्ञात घटक आहेत.
सनस्क्रीन याच हानिकारक यूव्ही किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते, हे वैज्ञानिक सत्य आहे.
ऑक्सिबेन्झोनसारखे काही रासायनिक घटक त्वचेतून शोषले जातात, पण त्यामुळे कॅन्सर होतो हे सिद्ध झालेले नाही.
काही अभ्यासात या घटकांमध्ये हार्मोनल असंतुलन (Endocrine Disruption) करण्याची क्षमता आढळली आहे, तरीही मानवी धोका अस्पष्ट आहे.
झिंक ऑक्साईड (Zinc Oxide) असलेले मिनरल (Physical) सनस्क्रीन त्वचेत शोषले जात नाहीत, त्यामुळे ते सर्वात सुरक्षित मानले जातात.
उच्च SPF चे सनस्क्रीन मेलेनोमासह त्वचेचे कॅन्सर टाळण्यासाठी प्रभावी ठरते.
वैज्ञानिक निष्कर्ष: सनस्क्रीनचे ज्ञात कॅन्सर प्रतिबंध फायदे हे त्याच्या अजून सिद्ध न झालेल्या संभाव्य रासायनिक धोक्यांपेक्षा खूप जास्त आहेत.