पुढारी वृत्तसेवा
उन्हाळ्यात अनेक लोक थंड पाणी पिण्यासाठी घरी माठ आणतात. पण माठाची खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवा.
माठ खरेदी करताना नेहमी उजेडात किंवा सूर्यप्रकाशात तपासा. माठ उलटा करून आतून पहा, जेणेकरून त्याला एखादे बारीक छिद्र असल्यास ते लगेच दिसून येईल.
माठावर बोटाने हलकी टिचकी मारून पहा. जर माठातून 'टन-टन' असा स्पष्ट आवाज आला, तर समजावे की तो माठ चांगला भाजलेला आहे. आवाज बदलेला असेल तर तो माठ घेऊ नका.
आजकाल नळ (तोटी) असलेले माठ सोयीचे वाटतात. पण घेताना ती तोटी व्यवस्थित बसवली आहे का आणि तिच्या आजूबाजूला गळती तर नाही ना, याची खात्री करून घ्या.
जास्त रंगवलेले किंवा पॉलिश केलेले माठ घेऊ नका, कारण त्यामुळे मातीची छिद्रे बंद होतात आणि पाणी थंड होत नाही.
माठ पाझरणारा नसावा, याची खात्री करा.
नेहमी लाल किंवा काळ्या मातीचा अस्सल माठ निवडा. पांढऱ्या रंगाचे किंवा खूप जास्त नक्षीकाम केलेले माठ दिसतात छान, पण ते पाणी थंड करण्यात तितके प्रभावी नसतात.