Summer Health Tips : उन्हाळ्यात ‌‘या‌’ पदार्थांचे सेवन गुणकारी

पुढारी वृत्तसेवा

तापमान वाढल्याने शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते.

यामुळे थकवा, चक्कर येणे, अशक्तपणा आणि कधी कधी उष्माघातासारख्या गंभीर समस्याही उद्भवतात.

कडक उन्हात डिहायड्रेशन आणि उष्माघातापासून स्वतःचे संरक्षण करायचे असेल तर आपल्या आहारात काही देशी म्हणजे घरगुती घटकांचा समावेश करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

मखान्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. ते शरीराला आतून थंड ठेवण्यास मदत करतात.

उन्हाळ्यात मखाना पाण्यात भिजवून खाल्ल्याने शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते आणि अशक्तपणा दूर होतो.

उष्माघात टाळण्यासाठी कच्चा कांदा खाणे आवश्यक आहे.

कांद्यामध्ये सल्फर संयुगे, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंटस्‌‍ असतात, जे शरीराचे तापमान थंड राखण्यास मदत करतात.

सब्जा बियांमध्ये फायबर, प्रथिने आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात, जे शरीराला थंडावा देण्यास आणि दीर्घकाळ हायड्रेशन टिकवून ठेवण्यास मदत करतात.