उन्हाच्या कडाक्याचा केसांवरही होतोय परिणाम; मग 'हे' उपाय नक्की करून पाहा

पुढारी वृत्तसेवा

केसांमधील ओलावा टिकवा

कडक उन्हामुळे केसांमधील नैसर्गिक ओलावा (Moisture) कमी होऊन केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात.

hair | file photo

बाहेर जाताना काळजी घ्या

उन्हात घराबाहेर पडताना स्कार्फ, मोठी टोपी किंवा छत्रीचा वापर करून केसांचे थेट उन्हापासून संरक्षण करा.

hair | Canva

केसांना हायड्रेटेड ठेवा

उन्हाळ्यात केस वारंवार धुवावे लागतात, त्यामुळे ओलावा टिकवण्यासाठी 'सल्फेट-फ्री' शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करा.

नैसर्गिक हेअर मास्क

आठवड्यातून किमान एकदा कोरफड (Aloe Vera) किंवा दह्याचा हेअर मास्क लावल्याने केसांना थंडावा आणि पोषण मिळते.

hair | Canva Photo

गरम पाण्याचा वापर टाळा

केस धुण्यासाठी अति गरम पाण्याचा वापर करू नका; कोमट किंवा थंड पाण्याने केस धुतल्यास मुळे मजबूत राहतात.

Side effects of hot water bath

तेल मालिश विसरू नका

आठवड्यातून दोनदा नारळाच्या तेलाने किंवा बदाम तेलाने हलक्या हाताने मसाज करा, ज्यामुळे टाळूला थंडावा मिळेल.

हीट स्टाईलिंगला 'नाही' म्हणा

उन्हाळ्यात केसांवर आधीच नैसर्गिक उष्णतेचा ताण असतो, त्यामुळे हेअर ड्रायर किंवा स्ट्रेटनरचा वापर शक्यतो टाळा.

पुरेसे पाणी प्या

केवळ बाहेरूनच नाही तर आतूनही हायड्रेशन महत्त्वाचे आहे; भरपूर पाणी प्यायल्याने केसांची चमक कायम राहते.

Drinking Water | Pudhari
येथे क्लिक करा...