summer diet: या 'पाच' गोष्टी उन्हाळ्यात खाणं टाळाच

Anirudha Sankpal

1- मिरची: हिरवी किंवा लाल मिरची उष्ण प्रकृतीची असल्याने पित्त वाढवते; अतिसेवनामुळे पोट बिघडणे, जुलाब आणि छातीत जळजळ होऊ शकते.

2- नॉनव्हेज व अंडी: हे पदार्थ उष्ण गुणात्मक असल्याने उन्हाळ्यात पचनाच्या समस्या, युरिक ऍसिड वाढणे आणि त्वचेचे विकार उद्भवू शकतात.

3 - गरम मसाले: लवंग, दालचिनी आणि काळीमिरी यांसारख्या तिखट मसाल्यांमुळे डिहायड्रेशन, चक्कर येणे आणि अति घाम येण्याचा त्रास होतो.

सौम्य पर्याय: गरम मसाल्यांऐवजी जिरे, बडीशेप आणि धणे यांसारखे थंड व सौम्य मसाले आहारात वापरणे अधिक हितावह ठरते.

4 - आंबट व खारट पदार्थ: लोणचे, पापड यांसारख्या पदार्थांमुळे शरीरातील उष्णता वाढते आणि शरीरात पाणी साठून राहिल्याने सूज येऊ शकते.

5 - तळलेले पदार्थ: भजी, वडे आणि समोसे पचायला जड असल्याने शरीराचे तापमान वाढवतात आणि चेहऱ्यावर पिंपल्स येण्यास कारणीभूत ठरतात.

डिहायड्रेशनचा धोका: तेलकट आणि हाय कॅलरी पदार्थांमुळे शरीर लवकर डिहायड्रेट होते, तसेच वजनावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.

योग्य वेळ: अंडी किंवा मांसाहार करायचा असल्यास तो रात्री टाळून सकाळी किंवा दुपारी कमी प्रमाणात करणे आरोग्यासाठी सुरक्षित आहे.

येथे क्लिक करा