Summer diet tips: उन्हाळ्यात अंडी, चिकन, मासे किती प्रमाणात खावेत?

पुढारी वृत्तसेवा

'उन्हाळा आला…तब्येत सांभाळा' अस म्हणतं बहुतांशजण आपल्या आहाराकडे लक्ष देतात. आपण उन्हाळ्यात आपलं शरीर थंड कसे राहील, याकडे लक्ष देत असतो.

पण या दिवसात आपण अंडी, चिकन आणि मासे यासारखे पदार्थ वगळतो कारण ते शरीरासाठी उष्ण मानले जातात.

आहारतज्ज्ञ याबाबत काय सांगतात ते जाणून घ्या

आहारतज्ज्ञ याबद्दल उलट सांगतात, उन्हाळ्यात अंडी, चिकन आणि मासे हे अन्नपदार्थ कमी प्रमाणात असले तरी ते खाणे आवश्‍यक आहे.

हे पदार्थ आपल्या शरीरासाठी महत्वाचे आहेत. हे पदार्थ तुमची उर्जा पातळी उच्च ठेवण्यासाठी विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे देत असतात.

अंडी विशेषत: शरीरात उष्णता निर्माण करतात; परंतु जर ते कमी प्रमाणात खाल्ले तर ते उत्कृष्ट पौष्टिक पदार्थ ठरू शकतात.

याशिवाय, अंडी, चिकन आणि मासे मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. हृदयाचे आरोग्य सुधारतात, रक्तदाब नियंत्रित ठेवतात.

तुम्ही शाकाहारी असाल, तर शेंगा, चणे, काळे बीन्स, शेंगदाणे, भोपळ्याच्या बिया, बदाम, बीन्स यासारखे पदार्थ खाऊ शकता. यात प्रथिनांचे उत्तम स्रोत असतात.